Accident | काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात

| Updated on: Jan 05, 2022 | 12:18 PM

काम सुरु असलेल्या एका ब्रिजला समोरच्या दिशेनंच गाडीनं धडक दिली. त्यामुळे जबर फटका बसून गाडीतील चार जण जागीच दगावलेत. यामध्ये गाडीच्या दर्शनी भाग चक्काचूर झाला.

Accident | काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात
Follow us on

सोलापूर : भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे समोर आली आहे. सोलापूर-विजापूर मार्गावर एक भीषण अपघात घडला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

नेमका कुठे झाला अपघात?

सोलापूर विजापूर रोडवरील कवठे गावाजवळ एक महिंद्रा XUV 500 चा भीषण अपघात झाला. एका निर्माणधीन ब्रिजला ही कार पहाटेच्या सुमारास धडकली. या भीषण अपघातात चार जणांवर काळानं घाला घातला. या अपघातातील सर्व जण हे कर्नाटकातील असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात चौघे ठार

अरुण कुमार लक्ष्मण, मेहबूब मोहम्मद अली मुल्ला, फिरोज सैफसाब शेख, मुन्ना, केंभावे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. केए 32 N 2484 या नंबरची गाडी अपघातग्रस्त झाली असून या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

काम सुरु असलेल्या एका ब्रिजला समोरच्या दिशेनंच गाडीनं धडक दिली. त्यामुळे जबर फटका बसून गाडीतील चार जण जागीच दगावलेत. यामध्ये गाडीच्या दर्शनी भाग चक्काचूर झाला. चालकाला अंदाज न आल्यामुळे किंवा गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जाते आहे. दरम्यान, अद्याप या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत अपघाताचा पंचनामा केला आहे. सध्या अपघातातील एका जखमी प्रवाशावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलीस आता या अपघाताप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या –

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

Sindhutai: ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं, आता… थरथरत्या आवाजात ममतांचं आवाहन

Sindhutai: ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं, आता… थरथरत्या आवाजात ममतांचं आवाहन

Mask | कोरोना विषाणू किती मिनिटांत गाठणार? मास्क ठरवणार! या 16 पैकी तुमचा मास्क कोणता?