Sindhutai: ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं, आता… थरथरत्या आवाजात ममतांचं आवाहन

Sindhutai: 'निघून गेल्या' हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं, आता... थरथरत्या आवाजात ममतांचं आवाहन
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर कन्या ममता यांचं भावनिक आवाहन

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अनाथांची माय निघून गेली, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र त्यांची कन्या ममता यांनी प्रतिक्रिया देताना आई निघून गेली... असं कृपया म्हणू नका, असं आवाहन केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 05, 2022 | 11:42 AM

पुणेः निराधार मुलांना मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. निधनाने असंख्य अनाथ मुले पोरकी झाली, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहेत. हजारो अनाथांची माय निघून गेली, असं वक्तव्य केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता (Mamata Sapkal)  म्हणाल्या, कृपया आई निघून गेली, असं कुणीही म्हणून नका. ती आमच्यात अजूनही जिवंत आहे आणि यापुढेही राहणार आहे, हे सांगताना त्या अत्यंत भावून झाल्या.

थरथरत्या आवाजात ममता यांचं आवाहन

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना त्यांनी कन्या ममता यांना खूप गहिवरून आलं होतं. आमच्यासाठी माईचा मृत्यू हा खूप अचानक झाला, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रतिक्रिया देताना ममता म्हणाल्या, सिंधुताई सपकाळ आपल्यातून निघून गेल्या आहेत, हा शब्द अजिबात वापरू नका. ते एक वादळ होतं, शांत झालं. आईसारख्या व्यक्ती कधीच या जगातून निघून जात नाहीत. त्या असतात, त्या आहेत. त्यामुळे निघून गेल्या हे लेबल लावू नका..’

शेवटचा संवाद काय झाला?

सिंधुताई सपकाळ यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्या रुग्णालयातच उपचार घेत होत्या. मात्र असं एकाएकी त्यांचं निधन होईल, याची कल्पना कुणालाही नव्हती. सिंधुताई आणि ममता यांचं शेवटचं बोलणं काय झालं, असा प्रश्न विचारला असता ममता म्हणाल्या, सध्या तरी तसं काही आठवत नाही. पण जे बोलणं झालं, त्यातही त्यांनी मुलांचीच चौकशी केली. मुलांची काळजी घ्या. शाळा सुरु झाल्या की नाही, मुले शाळेत जातात का, अशी चौकशी त्यांनी केली होती.

 काम असंच सुरु राहील, त्यातूनच ती आमच्यात जिवंत राहील

अनाथ मुलांना आधार देण्याचं मोठं कार्य सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर केलं. आता हे काम पुढेही असंच चालू राहणार असं आश्वासन ममता यांनी दिलं. त्या म्हणाल्या, ‘ तिचं सगळं काम जे.. ज्या पद्धतीने सुरु होतं, तसंच पुढे सुरू राहिल. तिने आम्हाला वाढवलं. तसंच, त्या पद्धतीतून हे कार्य अव्याहत सुरु राहील. त्या प्रत्येक गोष्टीतून ती आमच्यात जिवंत आहे, असं ममता म्हणाल्या.

इतर बातम्या-

Mask | कोरोना विषाणू किती मिनिटांत गाठणार? मास्क ठरवणार! या 16 पैकी तुमचा मास्क कोणता?

Feng Shui Tips | घरात विंड चाइम्स लावताय? मग वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें