मोठा ट्विस्ट! अमरावती सेक्स स्कँडल प्रकरणातील महिला हिंदू की मुस्लिम? सर्वात मोठ्या दाव्याने खळबळ

अमरावतीयेथील १८० महिलांचे लैंगिक शोषण करुन ३५० हून अधिक व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.

मोठा ट्विस्ट! अमरावती सेक्स स्कँडल प्रकरणातील महिला हिंदू की मुस्लिम? सर्वात मोठ्या दाव्याने खळबळ
अमरावती
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 15, 2026 | 12:06 PM

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा (अचलपूर तालुका) येथील लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली आहे. मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा, त्यांचे व्हिडीओ-फोटो बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुरुवातीला १८० तरुणींवर लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले होते. तसेच या तरुणींचे ३५० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचे दावे समोर आले होते. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

आरोपी एमआयएम पक्षाचा पदाधिकारी

या प्रकरणात पहिला मोठा ट्विस्ट म्हणजे आरोपीचा राजकीय संबंध. अयाज हा एमआयएम (AIMIM) पक्षाचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले. अचलपूर नगर परिषद निवडणुकीच्या वेळी त्याला पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी स्पष्ट केले की, “पूर्ण निवडणुकीच्या काळात त्याने पक्षासाठी कोणतेही काम केले नाही, त्यामुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे एमआयएम पक्षाचा आणि या आरोपीचा सध्या कोणताही संबंध नाही.”

महिलांची संख्या वाढण्याची शक्यता

दुसरा आणि अजून मोठा ट्विस्ट अल्पसंख्याक आयोगाकडून आला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, अचलपूर-अमरावतीतून महिलांचे शोषण झाल्याची तक्रार त्यांच्याकडे आली. त्यांनी त्या ठिकाणच्या एसपीशी बोलून चौकशी केली. यात आठ मुस्लिम महिलांचे शोषण झाल्याचे पुढे आले. यापैकी ६ महिलांचे फोटो आणि २ महिलांचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. बाकीचे व्हिडीओ-फोटो आरोपीने डिलीट केले असल्याचे सांगण्यात आले असून, ते रिकव्हर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक आयोगाची टीम उद्याला तिथे जात आहे. यात आणखी संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व तपास सुरू आहे

प्यारे खान म्हणाले, “मी त्यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. अल्पसंख्याक आयोगाची टीम उद्या तिथे जाणार आहे. यात आणखी संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व तपास सुरू आहे.”

Follow Us