प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मुलाचा मोठा संशय, तो हेल्मेटधारी मारेकरी नाहीच..

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. त्यातच आता अजून एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. पण पूर्णेकरांच्या मुलाने मोठा संशय व्यक्त केला.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मुलाचा मोठा संशय, तो हेल्मेटधारी मारेकरी नाहीच..
Pradeep Purnekar
| Updated on: Oct 13, 2026 | 11:34 AM

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आली. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांच्या भेटीला स्वत: उद्धव ठाकरे पोहोचले होते. यावेळी कुटुंबियांनी काही माहिती दिली. संजय राऊत सुषमा अंधारेंसारखे ठाकरे गटाचे नेतेही पूर्णेकरांच्या घरी पोहोचले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक भूमिका घेताना दिसला. शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापाैर यांच्यावर थेट आरोप केली जात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत. जबावात मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचे नाव घेण्यात आले. पूर्णेकरांच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यातच आता मोठी अपडेट या प्रकरणात येत आहे.

पोलिसांना सगळ्या मारेकऱ्यांना पकडण्यात यश आले. हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यात हेल्मेट असल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती. पोलिसांनी अजून एका मारेकऱ्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आणखी एक मारेकरी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी मारेकऱ्याला ताब्यात घेतले. प्रयागराजमधून ताब्यात घेतले. हेल्मेटधारी मारेकऱ्याचे नाव अमित सिंह असल्याचे कळतंय.

Loading...

पण पूर्णेकरांच्या मुलाने मोठा संशय व्यक्त केला. अटक केलेल्या अमित सिंग आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती वेगळा दिसत आहे. पाचवा आरोपी पकडण्यात आला, तो कुठल्याही अँगलने हेल्मेट घातलेला वाटत नाही. पकडण्यात आलेला आरोपी आणि सीसीटीव्हीमधील आरोपी दोन्ही वेगळे दिसत आहेत. बॉडी स्ट्रक्चर अजिबात जुळत नाहीये. पूर्णेकर यांच्या मुलाने व्यक्त केलेल्या संशयाने पोलिसांच्या कारवाईरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.

पूर्णेकर प्रकरणातील तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. पप्या शिंदे याला 14 ऑक्टोबरपर्यंततर संतोष ऊर्फ टल्ली अमित सिंग याला 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीप पूर्णेकर यांना संपवण्याचा कट रचला जात होता. कपडे आणि शस्त्रांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us