ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले, ठाकरेंचा फोन जाताच राजकारणात खळबळ!

ज्या-ज्या खासदारांनी आपली साथ सोडली आहे, त्या सर्वच खासदांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. येत्या 28 जून रोजी उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्याची आम्ही आता तयारी करत आहोत, असेही मकरंदराजे यांनी सांगितले.

ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले, ठाकरेंचा फोन जाताच राजकारणात खळबळ!
omraje nimbalkar and makarand raje nimbalkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 6:54 PM

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. आम्हाला आमच्या मतदारसंघात विकास करायचा होता. आम्हाला विकासासाठी निधीची गरज होती, असे कारण या खासदारांनी सांगितलेले आहे. एकूण सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या हितासाठीच मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ओमराजे यांच्या कुटुंबातीलच त्यांचे लहान बंधू मकरंदराजे निंबाळाकर यांनी दंड थोपटले आहेत. ओमराजे यांनी ज्या कारणामुळे ठाकरे यांची शिवसेना सोडली ते कारण मला पटलेले नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

उद्धव ठाकरेंचा मकरंदराजे यांना फोन

खासदार ओमराजे निबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी भाष्य केले. त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन कॉल केल्याचे समोर आले आहे. ठाकरेंनी धाराशिवमध्ये पक्ष बळकट करावा अशा सूचना मकरंदराजे निंबाळकर यांना केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच आता मकरंदराजे यांच्या राजकीय भूमिकेला महत्त्व आले आहे. मकरंदराजे निंबाळकर हे माजी नगराध्यक्ष आणि ओमराजे निंबाळकर यांचे बंधू आहेत.

धाराशिव जिल्हा हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला

ओमराजांनी ठाकरे यांची शिवसेना सोडण्यासाठी जी कारणे दिली आहेत ती मला पटली नाहीत, असं थेट मकरंदराजे यांनी सांगितले आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणार आहे, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहणार, मकरंद राजे निंबाळकर यांनी सांगितले आहे. धाराशिव जिल्हा हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो आम्ही शाबूत ठेवणार, असा निश्चय त्यांन बोलून दाखवला.

28 जून रोजी ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर

ज्या-ज्या खासदारांनी आपली साथ सोडली आहे, त्या सर्वच खासदांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. येत्या 28 जून रोजी उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्याची आम्ही आता तयारी करत आहोत, असेही मकरंदराजे यांनी सांगितले. त्यामुळे आता भविष्यात मकरंदराजे निंबाळकर यांना उद्धव ठाकरे ताकद पुरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास धाराशिव जिल्ह्यात दोन्ही बंधूच एकमेकांसमोर उभे राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us