आजारी नवऱ्याला बरं करतो सांगत घरात घुसला, डोक्यावर पाणी शिंपडून काळी जादू? महिलेसोबत किन्नरचं नको ते कृत्य
अनोळखी व्यक्तीला घरात घेताना 10 वेळा विचार करा.... आजारी नवऱ्याला बरं करतो सांगत, किन्ररने 25 वर्षीय एयर होस्टेससोबत नको ते कृत्य केलं. किन्नरने सर्वात आधी महिलेच्या डोक्यावर पाणी शिंपडलं, त्यानंतर बेडरुममध्ये नेत नको ते कृत्य... पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे.

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. किन्नर असल्याचं सांगत एक पुरुष 25 वर्षीय महिला एयर होस्टेसच्या घरात घुसला आणि तिच्या आजारी नवऱ्याला बरं करतो असं सांगत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कथित आरोपीची ओळख अनील शिंदे असून, तो 28 वर्षांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या 4 तासांत शिंदे याला बुधवारी कळवा येथील झोपडपट्टीतून अटक केली आहे. शिंदे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 100 सीटीटीव्ही कॅमेरे तपासले आणि कथित आरोपीपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे याने महिलेच्या घरातून निघण्यापू्र्वी तिच्याकडून 200 रुपये देखील घेतले. संबंधित घटना, मंगळवारी दुपारी 12.20 ते 12.50 रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे, किन्नरच्या वेशात महिलेच्या घरात आला. सर्वात आधी त्यांनी बिल्डिंगच्या वॅचमेचचा विश्वास संपादन केला आणि अनेकांचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या एयर होस्टेसच्या घारात पोहोचला,
पोलीस उपायुक्त दत्ता नालावडे यांनी सांगितल्यानुसार, ‘महिलेच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशात आरोपीने, तुझ्या घराला लागलेली वाईट नजर उतरवण्याचा दावा करत, तिच्या घरात प्रवेश केला.’, घडलेली घटना सांगत महिला म्हणाली, आरोपीने घरावर आणि तिच्यावर पाणी शिंपडल आणि बेडरुममध्ये घेऊन जात, बेडवर झोपण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपीने महिलेवर अत्याचार केले. एवढंच नाही तर, महिने आरडो-ओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने महिलेकडून 200 रुपये घेतले आणि फरार झाला.
घटना घडल्यानंतर पीडित महिला रात्री 11 वाजता पोलीस स्थानकात पोहोचली. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने संपूर्ण घटनेची चौकशी केली. पवई पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज क्लिप्सच्या आधारे आरोपीचा शोध लावला आणि शिंदेला अटक करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी आणि जादूटोणा यांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने असा दावा केला की, त्याचे कुटुंबीय भीक मागण्यासाठी ट्रान्सजेंडरचं रूप धारण करतात. त्याने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस आता करत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस नागरिकांना आवाहन करत आहेत की, स्वतःच्या घरात अनोळखी व्यक्तीला घेऊ नका. त्याचप्रमाणे एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या घरात का? आली आहे. याची चौकशी करा, त्यानंतर कोणाला घरात घ्या.