ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Nashik News: नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना मनमाड शहरातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Udhav Thackeray
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 25, 2025 | 12:12 PM

नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रभाग क्रमांक १०-अ मधील उमेदवार आणि गायकवाड चौक परिसरातील रहिवासी नितीन वाघमारे (वय अंदाजे ५०) यांचे सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नितीन वाघमारे हे मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अचानक जाण्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमले आहेत.

नितीन वाघमारे यांच्या आकस्मिक निधनामुळे प्रभाग क्रमांक १०-अ मधील निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेनुसार आता ठाकरे गटाला या प्रभागात नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे किंवा ती जागा रिकामी राहील.

मनमाड नगर परिषद निवडणूक: प्रचंड चुरस अन् बहुरंगी लढत

दरम्यान, मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह 33 नगरसेवक जागांसाठी उमेदवारी माघारीनंतर रिंगणात खरी लढत दिसत आहे.

-नगराध्यक्ष पदासाठी – 9 उमेदवार

-33 नगरसेवक जागांसाठी – 215 उमेदवार

एकूण 16 प्रभागांत सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढत

तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत तरुण उमेदवारांचा मोठा भरणा झाला आहे. गल्लीगल्लीत प्रचाराला वेग आला असून मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. काही जुन्या-जाणत्या माजी नगरसेवकांना मात्र जनतेकडून रोषालाही सामोरे जावे लागत आहे.

प्रमुख पक्ष आणि उमेदवार (नगराध्यक्ष पद)

-भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती – बोगेश पाटील

-शिवसेना (उबाथा) – प्रवीण नाईक

-अजित पवार गट राष्ट्रवादी – रविंद्र घोडेस्वार

-शरद पवार गट राष्ट्रवादी – शुभम चुनियान

-वंचित बहुजन आघाडी – नितीन जाधव

-बहुजन समाज पक्ष – प्रवीण पगारे

-अपक्ष – राजू निरभवणे, निमदेव हिरे आणि अन्य

काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर बहुजन समाज पक्ष, वंचित, अपक्ष यांच्यासह जवळपास सर्वच प्रभागांत बहुरंगी लढत होत आहे.

नितीन वाघमारे यांच्या निधनाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असला, तरी मनमाडच्या राजकीय वातावरणात निवडणुकीची धामधूम कायम आहे. आगामी काही दिवस निवडणुकीचे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.