AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजिंठा लेण्याच्या दगडात जसे चित्र कोरले तसे बावनकुळे, मनोज जरांगे यांची जोरदार टीका

धाराशिवच्या खेड गावात मनोज जरांगे पाटील यांचे आज जोरदार स्वागत झाले आहे. येथे मराठा बांधवाबरोबर आज त्यांनी बैठक घेतली आहे. जरांगे पाटील आज तुळजापूर येथे मुक्कामी असून उद्या तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला निघणार आहेत.

अजिंठा लेण्याच्या दगडात जसे चित्र कोरले तसे बावनकुळे, मनोज जरांगे यांची जोरदार टीका
Chandrashekhar Bawankule and Manoj Jarange
| Updated on: Aug 07, 2026 | 9:25 PM
Share

महसुल मंत्री बावनकुळे मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करीत आहे, मराठा मंत्र्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. जाहीरपणे पत्रक काढून रद्द करतोय. माझं देवेंद्र फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना आव्हान आहे, तुम्ही एवढंच म्हणा बावनकुळे यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू आणि संजय शिरसाठ यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू असं शिवसेनेच्या मराठा आमदारांनी म्हणावे, मग मी गप्प का बसावे असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अजिंठा लेण्याच्या दगडात जसे चित्र कोरले तसे बावनकुळे दिसतोय अशा एकेरी शब्दात जरांगे यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे.

मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे यासाठी खूप मीडिया ट्रायल घेतली आहे. मी जर आंदोलनात असलो तर नोंदी द्याव्या लागणार आहेत. मी जर आंदोलनात असलो तर कोल्हापूर आणि सातारा गॅझेट लागू करावा लागणार आहे. काही मराठ्यांचे समन्वयक आणि अभ्यासक हाताखाली धरायचे आणि माझ्या विरोधात आंदोलन करायचे अशा यांचा प्लान आहे. मी माझ्या संसारात बदल केला नाही,समाजाच्या संसारात बदल केलाय. नियती मराठ्यांच्या बाजूने आहे. एखाद्याला गूळ चारून मारणे हा प्रयोग फडणवीस यांच्याकडून सुरु आहे.स्लो पॉयझन सुरु आहे. बावनकुळे यांनी पत्र दिलं नोंदी रद्द करायला असाही आरोप जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर केला आहे.

बावनकुळे यांचं पत्र बावनकुळे यांच्याच ऑफिसमधून माझ्या हातात लागल्याचा गौप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ज्यांनी केलं त्यांचाच नाव मी घेत असतो. मोघम आरोप करत नसतो. बावनकुळे कशामुळे रद्द करतोय. जागच्या जागी हे लोकं दाबायला शिका अन्यथा तुमच्या जमिनी हडपल्या शिवाय राहणार नाहीत. तुमचे मुदडे पडतील. बावनकुळे आणि मराठ्यांचा काहीच संबंध नसतांना मराठ्याचं वाटोळं करत आहे असाही आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की आपल्याच मतांवर निवडून आले आणि आपल्याच विरोधात मंत्री पदाचा गैरवापर आहेत. संजय शिरसाट यांच्यासाठी मराठ्यांच्या पोरांनी कामं केलं, मात्र त्यानेच गद्दारी केली आपल्याशी. मंत्री रद्द करा म्हणाले तर अधिकाऱ्याचे काहीच चालत नाही. आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात काहीच माग ठेवायचं नाही, 5 मिनिटं सुद्धा वेळ द्यायचा नाही. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी घ्यायची आहे. आपल्याला मुंबईला जायची गरज नाही,त्यावेळी आपण गेलो तर फडणवीस नागपूर आणि शिंदे दरे गावाला निघून गेले. अजितदादा सुद्धा पुण्याला निघून गेले. आपल्याकडे मुंबईला जायची गरज नाही. याच्यानंतर आंदोलन होणार नाही. हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन होणार आहे असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा