Manoj Jarange : अंतरवालीत मोठं काही तरी घडणार? उपोषणाआधीच मनोज जरांगेंचा मराठ्यांना महत्त्वाचा संदेश

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत.

Manoj Jarange : अंतरवालीत मोठं काही तरी घडणार? उपोषणाआधीच मनोज जरांगेंचा मराठ्यांना महत्त्वाचा संदेश
manoj jarange news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 11:03 AM

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील हे उद्यापासून अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी शिंदे समितीने 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र त्वरित मिळावे, यासाठी उपोषणाला बसणार आहेत. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. जरांगे यांनी उपोषणाच्या एक दिवस आधीच मराठा समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठा समाजातील नागरिकांना अद्याप कुणबी प्रमाणपत्र दिलेलं नाही. तरुणांनी हे ठासून सांगितले पाहिजे. घरात झोपू नका. हे लोक हिणवू लागले आहेत. आपणच त्यांना खुर्चीवर बसवलं आहे. आता आपल्या लोकांचा अपमान करू लागले आहेत. मराठा समाज उदासीन आहे. त्यांना आरक्षण नको. मराठ्यांनी अर्ज केले नसल्याचे ते सांगत आहेत. आता तुम्ही अंतरवालीत येऊन सांगावे. ज्यांनी अर्ज केले , त्यांनी अर्ज घेतले, पण केले नाही. त्यांनीही येऊन सांगावं’.

मराठ्यांनो घरात बसू नका. लेकराबाळांचं वाटोळं करू नका. याच्या त्याच्या सभेला जाऊ नका. मराठ्यांनो शहाणे व्हा. तुमच्यातील आळस झटकून टाका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. मर्द मराठे पेटून उठा. मुख्यमंत्री फडणवीस सांगतात, तसे राधाकृष्ण विखे पाटील बोलू लागले आहेत. मराठ्यांमध्ये उदासीनता असून अर्ज केले नाही, असे ते सांगत आहेत. ज्यांचे अर्ज घेण्यात आले नाहीत. त्यांनी अंतरवालीत यावं. अर्ज करूनही कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्यांनी अंतरवालीत यावं. ज्यांची नोंद सापडली, त्यानंतरही कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. अर्ज घेतला नाही. त्यांनी नोंद घेऊन अंतरवालीत यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.

‘नोंद घेऊन घरात झोपा काढू नका. अंतरवालीत यावे. तुमच्या लेकाबाळाचं कल्याण होईल. महसूल पुरावा न मिळाल्याचे कारण सांगून कुणबी प्रमाणपत्र देत नाही. मेलेल्या माणसाचा अंगठा कसा देणार, काही पण नवीन काढतात. तो तुझा चुलताच नाही, असे कारण देतात. सरकार इतक्या भिकारडे विचाराचे नसावेत. हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळालं नाही, त्यांनीही यावं. कुणबी प्रमाणपत्र दिलं, पण व्हॅलिडिटी दिली नाही. त्यांनीही अंतरवालीत यावं. ज्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्या. नोंदीनुसार अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावं. तुमची पोरं शिकत आहे. आता पोरं नसतील, तर तुमचे नातू शिकतील. आताच संधी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले.

Follow Us