AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! नेपाळनंतर आता चीन हादरलं, भूकंपाने जमीनच डगमगली; नागरिकांमध्ये धावपळ

नेपाळमध्ये तीन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपामुळे मोठा जलप्रलय झाला, यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो बेपत्ता आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून नवीन तलाव फुटण्याची भीती आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातही 5.1 तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे नागरिक दहशतीत आहेत.

सर्वात मोठी बातमी ! नेपाळनंतर आता चीन हादरलं, भूकंपाने जमीनच डगमगली; नागरिकांमध्ये धावपळ
EarthquakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 11:55 AM
Share

तीन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आलेल्या जोरदार भूकंपानंतर मोठा जलप्रलय झाला. त्यामुळे नेपााळमध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील जनजीवन आज तिसऱ्या दिवशीही विस्कळीत आहे. अनेक गावं वाहून गेले आहेत. घरे, शेती, इमारती, पूल आणि सर्वच वाहून गेलं आहे. त्यामुळे नेपाळमध्ये हाहा:कार उडालेला असतानाच आता चीनमध्येही मोठा हादरा बसला आहे. चीनमध्ये जोरदार भूकंप आल्याने सर्वच हादरून गेले आहेत. जमीनच डगमगू लागल्याने अनेकांची पळापळ झाली. भूकंपामुळे चीनचे नागरिक दहशतीखाली आहेत.

दक्षिण-पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतात आज शुक्रवारी भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरच्या मते, लॉन्गचांग शहरात आज सकाळी 5.1 तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले. विशेष म्हणजे चीनच्या शेजारील नेपाळमध्ये आधी भूकंप आणि नंतर जलप्रलय झाल्यानंतर चीनमध्येही भूकंपाचे झटके जाणवल्याने चिनी नागरिक दहशतीखाली आहेत. हिमलाय परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात भूगर्भीय हालचाल होत असल्याने चीनसह नेपाळचंही टेन्शन वाढलं आहे.

नवीन तलाव फुटण्याची भीती

सिचुआनमध्ये भूकंप झाल्याच्या वृत्ताला चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरनेही दुजोरा दिला आहे. भूकंपाचं केंद्र लॉन्गचांग शहरात असल्याचं सांगितलं गेलं आहे. दरम्यान, चीनच्या शेजारीच असलेल्या नेपाळमध्ये तीन दिवसांपूर्वीच भोटेकोशी नदीच्या जवळ भूस्खलन आणि मोठा जलप्रलय आल्याने मोठा हाहाकार उडाला. या जलप्रलयात आतापर्यंत 490 लोक मृत्यूमुखी पडल्याचं समोर आलं आहे. सुमारे 1500 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आता त्याच परिसरात एक नवीन तलाव निर्माण झाला आहे. त्यात सातत्याने पाणी भरत आहे. तसेच हा तलावही फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेपाळी नागरिकांमध्ये दहशत आणि भयाचं वातावरण आहे.

नुकसान नाही, पण भय कायम

नेपाळमध्ये गुरुवारी रात्री उशिरा 3.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. या भूकंपात कोणतंही नुकसान झालं नाही. मात्र, भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. नेपाळी नागरिकांनी भयापोटी अख्खी रात्र जागून काढली होती. आता सिचुआनमध्ये आलेल्या ताज्या भूकंपामुळे चीनी नागरिक धास्तावले आहेत. मात्र, आज आलेल्या भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची नोंद नाही.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे