AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी असा लढा… दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, थेट प्लॅनच सांगितला

मी शेतकऱ्यांसाठी लढ्याची मोठी घोषणा करेन. वेळप्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, पण शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल, एवढी मोठी घोषणा मी आज करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी असा लढा... दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, थेट प्लॅनच सांगितला
| Updated on: Oct 02, 2025 | 1:22 PM
Share

राज्यात आज पाच दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहे. यात मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक नारायणगडावर आयोजित करण्यात आला आहे. राज्यात एका बाजूला शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन सुरू असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्यापूर्वीच शेतकऱ्यांबद्दल एक विधान केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या लढ्याची सर्वात मोठी घोषणा या मेळाव्यातून करणार असल्याची माहिती दिली.

शेतकऱ्यांसाठी लढ्याची मोठी घोषणा करणार

मनोज जरांगे पाटील हे सध्या प्रकृती अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली सध्याची स्थिती स्पष्ट केली. मला उभे राहता येत नाही, त्यामुळे मी भाषण करेन की नाही, हे सांगू शकत नाही,” असे विधान जरांगे पाटील यांनी केले. पण मी गडावर जाऊन मंदिरात बसून चर्चा करणार आहे, तसेच याच ठिकाणाहून मी शेतकऱ्यांसाठी लढ्याची मोठी घोषणा करेन. वेळप्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, पण शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल, एवढी मोठी घोषणा मी आज करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी नुकत्याच निघालेल्या जीआरचे महत्त्व सांगितले. हा जीआर निघाला आहे. यामुळे मराठा समाजाला ७० वर्षांतील सर्वात मोठा फायदा झाला आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना देखील आरक्षणात सामील करणार आहोत, असेही विधान जरांगे यांनी केले.

ॲम्ब्युलन्समधून गडावर दाखल होणार

जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नारायणगडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बीड पोलिसांनी संपूर्ण स्टेजची तपासणी केली आहे. बॉम्ब स्कॉड पथकाकडून परिसराची कसून पाहणी करण्यात आली आहे. तसेच जरांगे पाटील जिथे भाषण करणार आहेत, त्या स्टेजची झाडाझडती घेण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील हे दुपारपर्यंत गडावर दाखल होतील. त्यांच्या प्रकृतीमुळे, ते दुपारी ॲम्ब्युलन्समधून गडावर दाखल होणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली.

दरम्यान सध्या दसरा मेळाव्यासाठी हजारो मराठा आंदोलक आणि समर्थक गडावर जमले असून, त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. वेळप्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, पण शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा मी आज करणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता या मेळाव्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या