AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी, रिपोर्ट दिसताच…खुद्द जरांगेंनीच व्यक्त केली शंका; काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी, रिपोर्ट दिसताच...खुद्द जरांगेंनीच व्यक्त केली शंका; काय घडलं?
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 3:57 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आता वैद्यकीय पथकाकडून त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी जो रिपोर्ट दिला आहे, त्यावर खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच शंका उपस्थित केली आहे. पत्रकारांनीच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. रविवारी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. परंतु त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने कमी, कधी जास्त होत असल्याचं समोर आलं आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा. पहिल्या दिवशी माझी शुगर 94 होती. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले शरीरातील साखरेची पातळी 66 आहे. 94 वरून थेट 66 वर आली. त्यानंतर शुगर वाढली ती 72 झाली, 72 वरून ती 80 वर पोहोचली आहे. शुगर अचानक वाढायला कशी लागली? शुगर तर कमीच व्हायला पाहिजेना कारण मी तर कारी जागा सोडत नाही. नाहीतर तुम्हाला वाटायचं मी काहीतरी खातोय. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काही खातोय, तर मशिन आणून इथे चेक करा, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

माझ्या पोटात एक जरी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब निघाला तर तुम्ही म्हणता तिथे जीव द्यायला मी तयार आहे. अशी कोणती ही यंत्रणा आहे, हा विषय सिरियस आहे, खरंच सिरियस आहे. पत्रकारांनी याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझी शुगर कमी व्हायला लागली तर ती कमीच व्हायला पाहिजे ना? ती अचानक वाढायला कशी लागली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा