Manoj Jarange : जालन्यात 10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
जालन्यात 10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आह. गेवराईतील दौऱ्यात त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून गुन्हे दाखल झालेले काही जण फेसबुक, युट्युब, इन्टाग्रॅम चॅनल चालवतात. तर काही जण कमेंट करणारे समर्थक असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील समर्थकांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 10 ते 11 जणांवर धमकी,महिलेवर अश्लील आरोप करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सक्रिय महिला आंदोलक ललिता तारख यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेवर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मराठा आंदोलक ललिता तारख यांनी यापूर्वी 2 वेळेस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता 5 जणांसह इतर अज्ञात 5 ते 6 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या समर्थकांची नावे देखील समोर आली आहेत. भगवानराव जाधव, डी ए. उंबरे पाटील, विभीषण लिंबाजी नन्नावरे, बळीराम मोरे, संतोष पाटील राहटिकर अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. इतर अज्ञात 5 ते 6 जणांवरही गुन्हे दाखल आहेत. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, एक महिना उपोषणात होतो, महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती, नाव मोठं झालंय मागता कोणाला. मी घरात नाही बायकोने, लेकराने कोणाच्यातरी बांधाला कामाला जायचं आणि तीनशे रुपये द्या.. ही हाल अपेष्टा समाजाच्या लेकरा बाळांसाठी मनोज जरांगेने सहन केली आहे’.
‘गरीब मराठ्यांचं आंदोलन श्रीमंत मराठ्यांच्या जीवावर सुरू आहे, मला बसायला गाडी देतात. त्यांच्यावर केसेस, माझ्या सोबत राहणाऱ्यांवर दंड, चौकशा होतात असंही जरांगे म्हणाले. तर मला वाकून, शरण जाऊन जगायचं नाही. तुमच्या लेकरा बाळाचं रक्त विकून जर मी पैशावाला झालो. मी जर पदं घेतले, तर आयुष्यात मला सुखाची झोप येणार नाही, असंही गेवराईतील साठेवाडी येथे बोलताना ते म्हणाले.
