AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलकांना मोठे आवाहन, थेट म्हटले, लवकरात लवकर…

मराठा समाजाकडून सध्या मुंबईत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईच्या अनेक भागांमध्ये वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून महापालिकेच्या मुख्य रस्त्यावर आंदोलक हे ठिय्या करताना दिसले.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलकांना मोठे आवाहन, थेट म्हटले, लवकरात लवकर...
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 30, 2025 | 11:13 AM
Share

मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, काही मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. सध्या मराठा आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाली आहे. पोलिस हे आंदोलन करणाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना मोठे आवाहन केले. बीएमसी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ठिय्या करणाऱ्या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर आझाद मैदानावर पोहोचा असे त्यांनी म्हटले. मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगितले आहे. यासोबतच रस्त्यावर लावलेली सर्व वाहने पार्किंग आणि मोकळ्या मैदानात लावण्यास त्यांनी सांगितले आहे. पिण्याचे पाणी आणि बाथरूमची व्यवस्था नसल्याने मुले मुंबई महापालिकेच्या इमारतीबाहेर जमल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळपासूनच सीएसटीच्या पुढे ठिय्या आंदोलन करताना मराठा समाजाचे कार्यकर्त्ये दिसले. यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांचे पाणी आणि अन्न बंद केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांंनी म्हटले की, राज्यामध्ये काही झाले आणि राज्यअस्थीर झाले तर याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील. बीएमसीच्या रस्त्यावर सकाळपासून मराठा आंदोलक ठिय्या करत आहेत.

आता मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बीएमसीच्या रस्ता मोकळा होता का? हे पाहण्यासारखे आहे. यासोबतच मोठा आरोप करत जरांगे पाटील यांनी म्हटले की, परिसरातील हॉटेल दुकाने बंद करण्यात आली आहेत. मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असाहा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणे जरांगे पाटील हे टाळताना दिसत आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा