माझ्या नादाला लागू नका, नाहीतर शिंदेंचं सगळं बाहेर काढेल; जरांगेंचा रामदास कदमांना थेट इशारा…
सध्या राज्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील एका ऑडिओ क्लिपने खळबळ उडाली आहे. त्यावरुन शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत काही फोटो दाखवले त्याला आता जरांगे पाटील यांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे.

क्लिप कितीही मिनिटांची असो त्याची चिंता करु नका. आम्हाला भीती घालू नका, तुम्ही वयानं मोठे आहेत. मी आदर करतोय. यात घुसू नका, शिंदे साहेबांना संपवू नका, आम्हाला त्यांना संपवायचं असतं तर आम्ही हे बाहेर काढलं नसतं. तारीख तर तू सांगितली. कोण आहेत कोण नाहीत, हेही तुच सांगावं. असं म्हणत जरांगे पाटलांनी रामदास कदमांवर टीका केली आहे.
कोण काय करतं? काय नाही? काही घेणंदेणं नाही. कोणत्या बाटलीमध्ये काय आहे? काय नाही, हे रामदास कदमांनीच सांगावं. त्यांनीचे ते दिलं असावं, आणि माझ्या नादाला लागू नये, अन्यथा शिंदेंचं तर मग एवढं आहे की.. असं म्हणत जरांगे पाटलांनी थेट हल्लाबोल चढवला आहे.
क्लिपची तारीख कशी समजली ते रामदास कदमांनी सांगावं, असं थेट आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. तुम्ही म्हणालं तस वागायला आम्ही नोकर आहोत का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला आहे. हे एक प्रकारचं गौडबंगाल आहे. माझ्याबद्दल बोलणं सोडून द्या नाहीतर मीही सुरु होईल, असा इशारा यावेळी जरांगे पाटलांनी रामदास कदमांना दिला आहे.
रामदास कदमांनी माझा नाद करु नये, शिंदेंना संपवायचं असतं तर मी ऑडिओ क्लिपबद्दल सांगितलं नसतं, यामुळे शिंदे साहेबांनाही याप्रकरणाची माहिती झाली आहे. आम्ही जे सांगतोय तेच तुम्ही सांगायला पाहिजे होते. तू काय फोटोग्राफर होता का. आमचे तीन वर्षांपासून फोटो काढतोय. तू आमच्यातले लोक फोडले आणि आता फोटो दाखवतोय, अशी घणाघाती टीका मनोज जरांगेंनी रामदास कदमांवर केली आहे.
शिंदे साहेबांसाठी कदम म्हणजे धोकादायक माणूस आहे. शिंदे साहेबांचा स्वाभिमान कळत नाही. शिंदे साहेबांचे विचार माहित नाही. कदम हे लावालावीचे काम करतात. विनाकारण शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना सगळं कळलं म्हणून राग आला की काय?
ही पत्रकार परिषद घेतली फोटो दाखवले पण मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी ही पत्रकार घेण्यासाठी सांगितलं नसेल. १०० टक्के खात्रीशीर सांगतो. रामदास कदमच हे या प्रकरणाचे मास्टरमाईंड दिसत आहेत. यातून मुख्यमंत्री फडणवीसांचीही बदनामी होईल, असं ही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.