मला जवळच्या लोकांनीच धोका दिला, 15 दिवसांत सरकारने…; मनोज जरांगेंनी मनातलं सगळं सांगितलं

मला जवळच्या लोकांनीच धोका दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. माझ्या जवळची माणसं फोडल्याचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.

मला जवळच्या लोकांनीच धोका दिला, 15 दिवसांत सरकारने...; मनोज जरांगेंनी मनातलं सगळं सांगितलं
MANOJ JARANGE
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 12:09 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला 90 दिवसांचा अल्टिमेटम दिलेल्या मनोज जरांगे यांनी सरकावर माणसं फोडल्याचा आरोप केला. 15 दिवसांत सरकारने माझ्या जवळची माणसं फोडली. यावेळी माझ्या जवळच्या लोकांनीच मला धोका दिला, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सगळचं सांगितले. ते पुण्यात बोलत होते.

मनोज जरांगे पाटील हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मनोज जरांगे पाटील यांनी काल एमपीएससी आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी जर वेळ पडल्यास महाराष्ट्र बंद पाडू, असा इशारा दिला होता. त्यानंतर पुण्यात सकाळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मागील १५ दिवसांत सरकारने माझ्या जवळची माणसं फोडली. मी गरिबाचा गरिबांसाठी लढणार.माझ्या विरोधात बोलणारे त्यांना पश्चात्ताप होत आहे.  समाज संकटात असताना बाजूने उभा रहा. मी शांत आहे. तोपर्यंत मी बोलणार नाही. शेतकऱ्यांनो आलेल्या संकटाला तोंड द्या  आत्महत्या करु नका’. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर आरोप करणार्‍यांचा समाचार घेतला.

Loading...

जरांगे पुढे म्हणाले, ‘आपली किंमत किती आहे. तर दीड लाख रुपये. महाराष्ट्रातील समाज रस्त्यावर आला पाहिजे.ललिता तारख यांच्यावर मी बोलणार नाही. अंतरवाली सराटी या गावाने समाजासाठी खूप काही केले, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. आपण संयमाने घ्यायचे. एक दिवस त्यांनाच कळेल आपलं चुकलं.. त्या आपल्या भगिनी आहे. त्यांना सुद्धा थांबलं पाहिजे, शेवटी आपल्या समाजाचा विषय आहे. आपल्या लोकांनीच धोका दिला. मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईल. आमचा आमचा म्हणून आमच्या माणसासाठी आम्ही खूप केलं. त्यांच्यासाठी पण ते असं वागतील असं वाटलं नव्हते.. मी शांत बसलोय, तेव्हा अनेक नाव समोर येत आहेत.मला खूप अनुभव आला आहे. समाजासोबत प्रमाणिक रहा. समाज संकटात असताना समाजासोबत असणं गरजेचे आहे.  आमची माणसं फोडली जात आहे. मी लवकर त्यांची नावं पुराव्यानिशी जाहीर करतो’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us