AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाकेंबद्दल बोलताना जरांगे म्हणाले ‘किचडाचे प्रश्न विचारू नका’

Manoj Jarange Patil : "पोलिसांना विश्वासात घेऊन सागर बंगल्यावर बैठक घ्या. पोलिस ट्रक भरून पुरावे देतील. 30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे आहेत" असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाकेंबद्दल बोलताना जरांगे म्हणाले 'किचडाचे प्रश्न विचारू नका'
Laxman Hake- Manoj Jarange Patil
| Updated on: Mar 06, 2025 | 1:49 PM
Share

जालना मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड हा मनोज जरांगे पाटील यांचा राईट हँड असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. आमच्याकडे फोटो आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले. त्यावर “किचडाचे प्रश्न विचारू नका. आपण समर्थन करत नाही. चुकीला साथ देत नाही. मी कुणाचेही समर्थन करत नाही. त्या किचडाचे काय काढता? आम्ही प्रामाणिक लोक असून आणि सभ्य माणसे आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“या अधिवेशनात तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत. आरक्षणाची अंमलबजावणी करावी. सगे सोयरे अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व गुन्हे मागे घेऊ म्हणालेले, पावणे दोन वर्षे झाले. मात्र गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला असताना मागे न घेतल्याने गुन्हे मागे घ्या. शिंदे समिती काम करत नाही. अधिकारी विनाकारण वेठीस धरतात. शिंदे समितीला 24 तास कामाला लावावे” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

‘फडणवीस, मी नंतर कोणत्या…’

“बलिदान दिलेल्या परिवाराला अद्याप नोकऱ्या दिल्या नाही. आठ मागण्यांपैकी चार मागण्या तत्काळ मान्य करु असे म्हणाले होते. मात्र मान्य झाल्या नाही. आम्ही आझाद झालो नसून पुन्हा पेटून उठणार. फडणवीस, मी नंतर कोणत्या टोकाला हे मला सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

’30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे’

“धनंजय मुंडे हा स्वतःच्या प्रॉपर्टी कराडच्या नावावर ठेवत होता. फडणवीस जेव्हा आरोपीच्या संपत्ती जप्त करतील तेव्हा धनंजय मुंडे यांना त्रास होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे आहेत. SIT आणि CID कडे पुरावे आहेत. पुनर्तपास होणार. पोलिसांना विश्वासात घेऊन सागर बंगल्यावर बैठक घ्या. पोलिस ट्रक भरून पुरावे देतील. 30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे आहेत” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?