मनोज जरांगे मराठा योद्धा नाही तर मुस्लिम योद्धा, त्यांच्यामुळे…, अजय बारस्कर महाराजांच्या वक्तव्याने वातावरण तापणार

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 30 मे पासून जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना अजय बारस्कर महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मनोज जरांगे मराठा योद्धा नाही तर मुस्लिम योद्धा, त्यांच्यामुळे..., अजय बारस्कर महाराजांच्या वक्तव्याने वातावरण तापणार
Ajay Barskar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 8:44 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 30 मे पासून आपल्या विविध मागण्यासाठी ते आंतरवाली सारटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आज बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे.  दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची तारीख जाहीर करताच आता यावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना अजय बारस्कर महाराज यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “मनोज जरांगे मराठा योद्धा नाही तर मुस्लिम योद्धा” आहेत, असं अजय बारस्कर यांनी म्हटलं आहे. अजय बारस्कर यांच्या या वक्तव्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले अजय बारस्कर? 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनाची तारीख देखील जाहीर केली आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “सेटिंग पूर्ण न झाल्यानेच आंदोलन करणार आहेत,” असा आरोप अजय बारस्कर यांनी केला आहे. तसेच  हैदराबाद गॅजेटचा जीआर आणून गुलाल उधळला, मग उपोषण कशासाठी? अस सवालही त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे  मराठा समाजाचे EWS आरक्षणाचे नुकसान झाले आहे.  मनोज जरांगे मराठा योद्धा नाही तर मुस्लिम योद्धा आहेत, असंही अजय बारस्कार यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटलांकडून आंदोलनाची घोषणा 

दरम्यान हैदराबाद गॅझेटची पूर्ण अंमलबजावणी व्हावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. या सह इतर काही मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. येत्या 30 मे पासून ते आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत.

 

Follow Us