AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे पाटलांना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट आव्हानच स्वीकारलं…

संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या कराड गँगची दहशत तुरुंगातही सुरू असल्याची क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना देखील गोळ्या घालू असं म्हटलं आहे, त्यावर आता जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

जरांगे पाटलांना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट आव्हानच स्वीकारलं...
manoj jarange patil Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 8:40 PM
Share

बीड जिल्हा कारागृहात पुन्हा एकदा कराड गँगची दहशत चर्चेमध्ये आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. जेलमध्ये घडलेला प्रकार कैद्याकडून दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची एक कथित ऑडिओ क्लीप देखील व्हायरल झाली आहे. या संदर्भात जेल प्रशासनाकडून मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली, मात्र कैद्याने कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं, अशी माहिती जेल प्रशासानकडून देण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या कराड गँगची दहशत तुरुंगातही सुरू असल्याची क्लीप व्हायरल झाली आहे. बसण्याच्या जागेच्या वादातून प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले यांनी एका कैद्याला मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे आधीच्या जेलरची बदली करून आत्ताचा जेलर पण आम्हीच आणला आहे, आमचं इथे कोणीच काही बिघडू शकत नाही, मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्लॅनही शिजलाय, असा उल्लेखही या क्लीपमध्ये आहे. दरम्यान ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

व्हायलर क्लीप समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. गोळ्या घालायचं लांब राहिलं, तू फक्त मला बघून जा असं थेट आव्हानच जरांगे पाटील यांनी दिलं आहे. तू गोळ्या घालायला फक्त इथे येच त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तेव्हा तुला कळेल. आमचा समाज ही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात,  रक्त सांडणं कशाला म्हणतात हे आणखी एकदा संपूर्ण भारत बघेल, तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे आणि मुंडकं एकीकडे झालेलं तुला दिसेल, तू मला फक्त गोळ्या घालूनच दाखव. आमच्याकडेही गोळ्या आहेत. तुम्ही जर गोळ्या घालून आमची लोक मारणार असाल तर आमच्याकडे कुऱ्हाडी आहेत. मी मराठ्यांना संयम ठेवायला सांगतो पण तुमची मस्ती अशीच राहीली तर मग काही खरं नाही, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?