परळीच्या विश्रामगृहात कोण कोण होतं? दादा गरुडचा व्हिडीओ समोर, जरांगे पाटील हत्या कट आरोप प्रकरणात मोठं ट्विस्ट

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे, दरम्यान आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

परळीच्या विश्रामगृहात कोण कोण होतं? दादा गरुडचा व्हिडीओ समोर, जरांगे पाटील हत्या कट आरोप प्रकरणात मोठं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2025 | 4:33 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप होत आहे. या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केलं आहे, दादा गरुड आणि अमोल खुणे असं या दोन संशयितांचं नाव आहे. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

या प्रकरणात अटक असलेला संशयित दादा गरुडचा धनंजय मुंडेंसोबत भेट झाली, या कबुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. परळीतील शासकीय विश्रामगृहात भेट झाल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा होता, जरांगे पाटील यांच्या दाव्यानंतर आता कबुली देतानाचा दादा गरुडचा व्हिडीओ समोर आला आहे. शासकीय विश्रामगृहात परळीतील अनेक रथी, महारथी बसलेले होते,  अमोल खुणे, कांचन मुंडे आणि धनंजय मुंडे हे 25 मिनिटं दुसऱ्या खोलीत बसले होते, असा दावा दादा गरुड याने या व्हिडीओमध्ये केला आहे. मी तीथे दुसऱ्या कामासाठी गेलो होतो असंही तो या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोप अमोल खुणे हा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रहिवासी आहे, पोलिसांकडून या प्रकरणात त्याच्या घराची देखील तपासणी करण्यात आली आहे, दरम्यान अमोल खुणे याच्या बायकोने आपल्या पतीवरील आरोप फेटाळले आहेत. त्यांना या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा दावा तिने केला आहे. दारू पाजून त्यांना फसवण्यात आलं,  माझे पती मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एक अपशब्द सुद्ध सहन करू शकत नाहीत, त्यांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी एका ताटामध्ये जेवण केलं आहे, असं अमोल खुणे याच्या पत्नीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे माझा मुलाग असं करूच शेकणार नाही असं अमोल खुणेच्या आईने म्हटलं आहे.