Manoj Jarange: आमच्या क्लिप प्रकरणातही तेच घडलं; वैभव चव्हाण प्रकरणात मनोज जरांगेंचा सूचक इशारा, म्हणाले- गृहमंत्र्यांनाही सांगतोय…

Manoj Jarange News: वैभव चव्हाण प्रकरण दाबू नका. CID किंवा SIT मार्फत तपास करा, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर टीका केली आहे.

Manoj Jarange: आमच्या क्लिप प्रकरणातही तेच घडलं; वैभव चव्हाण प्रकरणात मनोज जरांगेंचा सूचक इशारा, म्हणाले- गृहमंत्र्यांनाही सांगतोय...
Manoj Jarange Warning Maharashtra Government
| Updated on: Nov 07, 2026 | 3:35 PM

बीडमधील नवगण राजुरी येथील मृत वैभव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे वैभव चव्हाण यांच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांनी वैभव चव्हाण यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास CID किंवा SIT मार्फत करण्याची मागणी केली. तसेच सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

वैभव चव्हाण यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेतील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्याची माहिती समोर आली होती. वैभव यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Loading...

सरकारकडून पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले जात असले, तरी तक्रार केल्यानंतरही योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, सरकार फक्त म्हणतंय पारदर्शक पारदर्शक पण तक्रार केल्यानंतर. त्यांनी फोटो दाखवले आहेत. त्यात जखमा दिसत आहेत. म्हणजे ही तर हत्या आहे. CID, SIT च्या माध्यमातून तपास झाला पाहिजे. सरकारने केस दाबली नाही पाहिजे. सरकार दखल घेण्यासाठी नाहीच. अगोदर सांगितले तरी कारवाई होत नाही. त्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार गठीत झालेलं आहे.

ते म्हणाले की, काही दिवसांनी यांच्या पक्षाला नाव लागू नये गुंड सांभाळणारे. खरं सांगणारंच सरकारला ऐकत नाही. येवल्याचं बलात्काराचं एक वर्षापुर्वीचं प्रकरण आहे. आमदार लेवलचे लोकं यात आहेत अशी माहिती आहे. एका बाबाने अत्याचार केला त्यावेळी बाबा म्हणतील तसं कर असं आमदार म्हणाला. पण मला शंका येत नाही पण माहिती घेत आहोत. पण हे खोटं कसं धरायचं कारण न्यायालयाने यात गुन्हा दाखल करायला सांगितले आहे. तो आताच शहाणा झालेला पक्ष आहे. या प्रकरणात पाठीशी घालू नका, जेलमध्ये डांबा. आमच्या क्लीपच्या प्रकरणात पण तेच आहेत. म्हणून अगोदर गुन्हा नाही, अगोदर एसआयटी नेमली आहे. आता पोलीस पळतील नाही पळाले तर अंगलट येईल‌. गृहमंत्र्यांना पण सांगतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us