AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणार, मनोज जरांगे यांचा इशारा

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरु केलंय. फडणवीसांना गुडघे टेकायला लावणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणार, मनोज जरांगे यांचा इशारा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 18, 2024 | 12:42 AM
Share

मराठावाडा मुक्ती संग्रामाच्या दिवसापासून जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारला शेवटची संधी असल्याचं सांगत, जरांगेंनी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. जरांगेंचं हे 6 वं आमरण उपोषण सुरु झालं आहे. जरांगे पाटलांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा. दुसरी मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरुन सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अंमलबजावणी करा आणि तिसरी हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा.

जरांगेंची मागणी स्पष्ट आहे, की मराठा समाजाला कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या. त्याचसंदर्भात, जरांगेंचा मुंबईच्या दिशेनं निघालेला मोर्चाला, मुख्यमंत्री शिंदेंनी सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून शांत केला होता. आता जरांगेंचा सवाल आहे, की अधिसूचना काढली मग सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी का नाही ?

मुख्यमंत्री लवकरच योग्य निर्णय घेतील, असं शिंदेंचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या सव्वा 2 महिन्यांवर आहे. विधानसभेची आचरसंहिता निवडणुकीचा घोषणा पुढच्या 15 दिवसांत म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होईल. खरं निवडणुकीची तयारी, जरांगेंनीही केली आहे. महायुतीचे 113 आमदार पाडण्याचा इरादा त्यांनी बोलूनही दाखवला मात्र, त्याआधी आपण सरकारला शेवटची संधी देत असल्याचं जरांगेंच म्हणणं आहे.

दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणी देखील होऊ लागली आहे. आठ दिवसात धनगरांच्या आरक्षणाचा विषय मिटला नाही तर राज्यभर धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार. या आंदोलनात होळकर घराणे तितक्याच ताकतीने सहभागी होणार तसेच आगामी विधानसभेला धनगरांची ताकद या सरकारला दाखवणार असा इशारा अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी दिला आहे.

अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी उपोषणकर्त्यांची आज भेट घेतली. पंढरपुरात धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी भूषणसिंह राजे होळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स