Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा काँग्रेसला मोठा इशारा, VIDEO

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा काँग्रेसने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा काँग्रेसला मोठा इशारा, VIDEO
मनोज जरांगे पाटील
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2024 | 11:12 AM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे. “मराठा आरक्षण आणि मराठा जाती विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारला पाडेन आणि काँग्रेसच्या सर्व सीट पाडेन” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जाल्यानाचे खासदार अमर काळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी मीडियाच्या बूमसमोर स्टेजवरुनच मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा काँग्रेसने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले काँग्रेसचे अमर काळे यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यांनी भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबद्दलचे आपले विचार मांडले. “आमची लेकरं मोठी झाली पाहिजेत. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जीव जाळतोय, पण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

‘विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल’

‘मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करतोय. आम्हला दुसरं काही अपेक्षित नाही’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. भेट घ्यायला आलेल्या कल्याण काळेंसंदर्भात म्हणाले की, “ते कशासाठी आले मला माहित नाही. बसले त्यांनी चर्चा केली. काँग्रेस मराठ्यांची मतं घेते आणि निवडून आल्यावर आमच्याविरोधात वडेट्टीवार बोलतायत. याबद्दल काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली” “उपोषणाच्या काळातच मागण्या पूर्ण करा नंतर नको सरकारला आमचा रोष परवडणारा नाही. आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “सरकार आमच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली. विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.