मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना मोठा संशय, थेट म्हणाले, आता आम्ही भुई धरली असून..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर त्यांना मोठे यश मिळाले. आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काही आणखीन मंत्री आणि आमदार जरांगे यांच्या उपोषणाच्या मंचावर पोहोचले आणि त्यांनी आठ महत्वाच्या मागण्यांपैकी 6 मान्य करत थेट उपोषण संपवले. यामध्ये हैद्राबाद गॅझेट आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण […]

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना मोठा संशय, थेट म्हणाले, आता आम्ही भुई धरली असून..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 19, 2025 | 12:13 PM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर त्यांना मोठे यश मिळाले. आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काही आणखीन मंत्री आणि आमदार जरांगे यांच्या उपोषणाच्या मंचावर पोहोचले आणि त्यांनी आठ महत्वाच्या मागण्यांपैकी 6 मान्य करत थेट उपोषण संपवले. यामध्ये हैद्राबाद गॅझेट आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण अशाही मागण्या मान्य केल्या. सातारा गॅझेटसाठी सरकारने जरांगे यांच्याकडे वेळ मागितला आहे. सध्या मराठवाड्यातून पूर्ण मराठा हा ओबीसीमध्ये गेल्याचे जरांगे यांनी जाहीरही केले. मात्र, ओबीसी समाज सरकारने काढलेल्या या जीआरविरोधात रस्त्यावर उतरताना दिसतोय. हा जीआर म्हणजे ओबीसींवर मोठा अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले.

आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठे भाष्य केले. जरांगे पाटील यांनी म्हटले की, अनुभवी लोक बोलत आहेत, त्यांचे वयही आहे आणि त्यांनी कामही केले हे खरं आहे. ते जे सांगत आहेत ते चूक आहे की, बरोबर हे देखील शोधू पण नंतर..हकरत नाही. त्यांच्या बोलण्याला आपण सन्मान दिला पाहिजे. पण हे कधी…जेव्हा तुम्ही एकदा बोलले दोनदा बोलले फक्त तेव्हाच..ज्ञानी माणून आणि अभ्यासू माणूस काय करतो…एकदा दोनदा मीडियाच्या माध्यमातून बोलतो.

नाही ऐकले तर तो थेट थांबतो. पण 20 ते 22 दिवस रोज रोज तेच सातत्याने म्हणणे म्हणजे हा राजकीय डाव शिजतोय, खूप मोठं षडयंत्र शिजतंय. रोज समाजाचं काम करणारा, मोर्चे काढणारा, अभ्यास करणारा ज्ञानी बुद्धी जिवी रोज नाही बोलू शकत. मी हे बोलण्याचे कारण म्हणजे मी तुम्हाला आवाहन केले ना मी या म्हणून. तुम्ही येत नाहीत आणि नंतर बोलता. मी अगोदरच सांगितले होते की, काही रूसवे, फुगवे असतील तर समाजासाठी सोडून द्या.

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सर्वांनी या असे मी हात जोडून सांगितले होते. तेव्हाही आले नाहीत आणि आताही आले नाहीत. मग आता यावरून दिसतंय की, सातत्याने हे बोलत आहेत, म्हणजे खूप मोठा डाव शिजत आहे. आता हे कोण करतंय हे आम्ही उघडे पाडणार आहोत. आम्ही भुई धरली असून याच्या मागे कोण हे शोधण्याचे काम सुरू आहे. आम्हाला हा रात्रीपासून संशय यायला लागला अगोदर नव्हता. कालपर्यंत आमच्यासोबत आणि आज तिकडे असेही जरांगे यांनी म्हटले.