Manoj Jaranage Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव, दोन गट आले आमने-सामने
Manoj Jaranage Patil : गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य करुन घेतली.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन दोन गटात वाद झाल्याचं वृत्त आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगावात ही घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या वादातून दोन गटात बाचाबाची झाली. या प्रकरणी करुंदा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या बद्दल जाब विचारण्यासाठी जरांगे समर्थ भेंडेगावात गेले होते.
जाब विचारण्यावरुन दोन गटात बाचाबाची झाली. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगावातील घटना आहे. बाचाबाची झाल्यामुळे भेंडेगावत काही काळ तणाव निर्माण झाला होता. करुंदा पोलिसांनी गावात शांतता प्रस्थापित केली. यानंतर जरांगे समर्थक पोलीस ठाण्यात जमले.
तात्काळ पोलीस ठाण्यात धाव
मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी जरांगे समर्थकांनी मागणी केली. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी करुंदा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. वसमत तालुक्यातील भेंडेगावातील एक इसमाने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल पोस्ट केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा
गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य करुन घेतली. काल, हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात मुंबई हाय कोर्टात दाखल झालेली जनहित हाय कोर्टाने फेटाळून लावली. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे, दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.”आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, गोरगरिबांच्या बाजूने न्यायदेवता उभी राहाते, सरकारनंतर न्यायदेवता हीच गोरगरिबांचा आधार आहे. सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार आहे” असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे मोठे नेते आहेत.
