Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारकडून छत्रपती संभाजी राजेंना चर्चेचे निमंत्रण; शिष्टाईचे प्रयत्न सुरू

मुंबईत उपोषणाला बसलेल्या छत्रपती संभाजी राजे यांच्या ट्वीटर हँडलवरून आज सकाळी एक ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत.

Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारकडून छत्रपती संभाजी राजेंना चर्चेचे निमंत्रण; शिष्टाईचे प्रयत्न सुरू
सलग तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरुचImage Credit source: Facebook/Yurvaj Sambhajiraje Chatrapati
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:54 AM

मुंबई : मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) इतर प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेले खासदार छत्रपती संभाजी राजे यांना (Sambhaji Raje Chatrapati) अखेर राज्य सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले आहे. थोड्याच वेळात मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. यावेळी छत्रपती संभाजे राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित असणार आहे. या बैठकीत राज्य सरकार काय प्रस्ताव ठेवणार, तो खासदार छत्रपती संभाजी राजे मान्य करणार का, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरही सुनावणी होणार आहे.

गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर ठाम

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल त्यांची आझाद मैदान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. छत्रपती संभाजी राजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती गृहमंत्र्यांनी खा. संभाजीराजे यांना दिली. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांना अवगत केले होते. मात्र, त्यानंतरही राजे उपोषणावर ठाम होते.

तब्येतीच्या तक्रारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे बेमुदत उपोषण सुरू होऊन साठ तासांपेक्षा जास्त वेळ झालाय. त्यामुळे त्यांची रक्तातील साखर कमी झालीय. रक्तदाब कमी झालाय. हृद्याचे ठोकेही वेगाने पडत आहेत. रक्तातील साखर वाढवण्यासाठी डॉक्टरांनी राजेंना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी आणि इतर मागण्यांवर मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

राजेंचे ट्वीट

मुंबईत उपोषणाला बसलेल्या छत्रपती संभाजी राजे यांच्या ट्वीटर हँडलवरून आज सकाळी एक ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजी राजेंनी नकार दिला आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.