
संजय राऊत म्हणाले की, आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता. फडणवीसांना घेरणं हा होता. एकनाथ शिंदेंनी तुमच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हे सगळं केलय असं त्यांच म्हणणं आहे. या आरोपावर आज मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं. “शिंदे साहेब बिचारा माणूस तस कधीच करु शकत नाही. राऊत साहेबाना माहित असेल, राजकीय कारणं असतील. राऊत साहेब चांगेल नाहीत अस मी म्हणत नाही. परंतु असं खरं असतं तर मी म्हणलं असतं. आम्हाला आरक्षण नाही पाहिजे. फक्त फडणवीसांना घेरायच आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्हाला काय म्हणाले मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, उभं राहू देणार नाही. मराठे कसे येतात पाहू?. एकदिवसाची परवानगी. मग, त्या रागात तसं करायचं असतं, तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतलं असतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही शिंदेंच आंदोलक हस्तक आहात, असा त्यांचा आरोप आहे. “मी फक्त मराठ्यांचा नोकर आहे. मराठयाचं पोरगं आहे. मी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस यांना मोजत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
…तर गेल्या, गेल्या वर्षावर गेलो असतो
“आपलं आहे ते रोखठोक. माझा समाज माझ्या पाठिशी आहे. मी समाजाबरोबर आहे, मी रिझल्ट देतो. शब्द दिलेला मुंबईत जाणार, गेलो. मी मुंबईत गेलो नसतो तर एकट्यामुळे जातीचा स्वाभिमान दुखावला असता. खाली बघावं लागलं असतं. यावेळेस सांगितलेलं, मी जीआर आणणार, आणला” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “एकनाथ शिंदे किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं, तर आरक्षण नको म्हणालो असतो. फडणवीसांना घेरायचं असतं, तर गेल्या, गेल्या वर्षावर गेलो असतो. आरक्षण गेलं खड्डयात म्हटलं असतं. मला राजकारण नकोय, आरक्षण पाहिजे हे दोन वर्षात सिद्ध केलय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन चालवण्याची कोणाची टाप नाही
संजय राऊत तुमची बदनामी करतायत असा अर्थ होतो, या पत्रकारांच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कोणत्या उद्देशाने ते म्हणाले हे माहिती नाही. मी तो बाईट ऐकलेला नाही. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन चालवण्याची कोणाची टाप नाही”
तिथे झोपून राहून आम्ही दगंली करायच्या होत्या की काय?
जरांगे समाधानी परतले याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या, या राऊतांच्या वक्तव्यावर जरांगे यांनी उत्तर दिलं. “जीआर निघाला ना, तिथे झोपून राहून आम्ही दगंली करायच्या होत्या की काय? हैदराबाद गॅझेटियकर, सातारा गॅझेटियर घेतल ना” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.