Maratha Reservation : मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा सुरू, आरक्षणासंबंधी गुड न्युज मिळणार का?

Maratha Reservation new GR आज रात्रीपर्यंत विशेष अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर सरकाच्या दिवसभर मॅराथॉन बैठका पार पडल्या. त्यानंतर रात्री अकरा वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशी येथील पीएमपीएल मार्केटला पोहचले आहे.

Maratha Reservation :  मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा सुरू, आरक्षणासंबंधी गुड न्युज मिळणार का?
मनोज जरांगेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 11:38 PM

मुंबई : मनोज जरांगे यांचा भव्य मोर्चा सध्या मुंबईच्या वेशीवर एपीएमसी मार्केटमध्ये थांबलेला आहे. मनोज जरांगे यांच्या सग्या सोयऱ्यांना आरक्षण (Maratha Aarakshan) देण्याच्या मागणीसंबंधी सरकारने तोडगा काढला का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला आंदोलन स्थळी पोहचलं आहे. या शिष्टमंडळात समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ नुकतेच आंदोलन स्थळी पोहचले असून मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. तुर्तास शिष्टमंडळाच्या सदस्यांपैकी माध्यमांशी बोलण्यासाठी कोणीच तयार नसल्याचंही दिसत आहे.

आज गुड न्युज मिळणार?

आज रात्रीपर्यंत विशेष अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर सरकाच्या दिवसभर मॅराथॉन बैठका पार पडल्या. त्यानंतर रात्री अकरा वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशी येथील पीएमपीएल मार्केटला पोहचले आहे. माध्यमांशी तुर्तास बोलण्यास नकार दिला आहे. सचिव सुमंत भांगे, मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर आरगळ, अमोल शिंदे, मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा सुरू

सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू आहे. सग्या सोयऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणासंबंधी तसेच आरक्षणासंबंधी इतर मागण्या संबंधी सरकारची भूमीका काय आहे या बाबात चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान आज गुड न्युज मिळणार असं सुचक विधान शिष्टमंडळाने केलं होतं, मात्र त्यावर अधिक प्रतिक्रीया देण्यास त्यांनी नकार दिला होता.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.