AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांचं नवं फर्मान… म्हणाले, काही दिवस अंतरवली सराटीकडे…

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे.

मनोज जरांगे यांचं नवं फर्मान... म्हणाले, काही दिवस अंतरवली सराटीकडे...
| Updated on: Oct 21, 2024 | 7:48 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उभे करा आणि ज्या ठिकाणी शक्यता कमी आहे त्या ठिकाणी जे उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडतील त्यांना पाठिंबा द्या असं जरांगे पाटील यांनी रविवारी झालेल्या बैठकीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आता त्यांनी मराठा बांधवांना विनंती केली आहे. चार-पाच दिवस अतंरवालीकडे कोणत्याच बांधवांनी येऊ नये, यामुळे मतदारसंघात उमेदवार ठरवता येत नाहीत. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरा तीस- पस्तीस दिवस मला मोकळा वेळ द्या. गावात राहा, निर्णय काय होतो यावर सावध राहा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

चार-पाच दिवस अंतरवालीकडे कोणत्याच बांधवांनी येऊ नये, यामुळे मतदारसंघात उमेदवार ठरवता येत नाही. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, मला जरा तीस-पस्तीस दिवस  मोकळा वेळ द्या, गावात राहा निर्णय काय होतो यावर सावध राहा. खरंच सांगतो मला काम करता येत नाही, आज पूर्ण वेळ दिवस वाया गेला आहे. फक्त फोटो आणि भेटी एवढंच झालं. पुढचं काम झालं नाही तर तुम्ही मला नाव ठेवताल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही आजपासून तयारी सुरू केली आहे, कोणत्या मतदारसंघात लढायचं ते. जिथे आम्ही राज्यात लढणार नाहीत, तिथे मिरीटप्रमाणे कोण आहे? अपक्ष ताकदवर कोण आहे हे आम्ही बघणार आहोत. आम्ही वैयक्तिक मतदारसंघात निवडणूक लढवणार आहोत ते फायनल झाल्याशिवाय सांगता येणार नाही. जेव्हा आमचे मतदार संघ आणि उमेदवार फायनल होतील त्या दिवशी ते चित्र स्पष्ट होईल. आम्हाला विचारल्याशिवाय कोणीही लेखी बॉण्ड आणू नका, संयम ठेवा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे