AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलन पेटलं, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; मकर सक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आता महिना उलटून गेला आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे.

आंदोलन पेटलं, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; मकर सक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा
| Updated on: Jan 12, 2025 | 8:27 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आता महिना उलटून गेला आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले आहेत, कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, मात्र त्याच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्या 13 जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे, तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोगचे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.  मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्यात यावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी.  शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीष मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी.  SIT कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

नेमकं काय म्हणाले धंनजय देशमुख? 

वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, त्याच्यावर देखील हत्येचं 302 कलम लावा. नाहीतर उद्या हे आरोपी माझा देखील खून करतील. जर त्याच्यावर मोक्का लागला नाही तर उद्यापासून आम्ही टॉवरवर जाऊन आंदोलन करणार आहोत. मी स्वत:लाच संपवून घेतो, म्हणजे माझ्या भावाला तरी समाधान मिळेल की माझा भाऊ सत:हूनच संपला, त्याला आपल्या सारखं मारलं नाही, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांनी आता आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान