उत्तरेकडून थंड वारे, राज्यात हुडहुडी वाढली, तापमानात मोठी घट, या जिल्ह्यांमध्ये..

राज्यातील हवामान बदल झाला असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उत्तरेकडून थंड वारे येत आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून थंड वारे, राज्यात हुडहुडी वाढली, तापमानात मोठी घट, या जिल्ह्यांमध्ये..
Temperatures
| Updated on: Nov 22, 2026 | 9:02 AM

राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. तापमानात मोठी घट झाली. जवळपास जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही दिवसात तापमानात मोठी घट होईल. कोकणात थंडीचा कडाका वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा गेल्या चार दिवसांपासून पाच अंशाने घसरला. रत्नागिरी जिल्ह्याचे तापमान 18 अंशांवर आहे. खाडीपट्ट्यात दाट धोक्याची चादर बघायला मिळतंय. उक्षी गावात धुक्याचा डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा. दोन डोंगरांच्यामधून वाहणाऱ्या बावनदीवर धुक्यांच्या ढगांची चादर पसरली आहे. थंडीच्या माहोलामध्ये जणू काही स्वर्गवत वाटावं कोकणातलं रूपड. टॉप एंगलच्या माध्यमातून धुक्याचा अद्भुत नजारा

अकोला शहरात आज पहाटे धुक्याची चादर पसरल्याचं पहायला मिळाली असून यंदाच्या वर्षातील पहिलंच दाट धुकं आज अकोलेकरांच्या अनुभवायला मिळालं आहे. सकाळच्या सुमारास शहरातील रस्ते, इमारती आणि परिसर धुक्याने व्यापला आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वातावरणात झालेला हा बदल नागरिकांसाठी सुखद अनुभव ठरत असून जणूकाही या ठिकाणी कश्मीरच अवतरल का असं वाटत आहे.

Loading...

नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीत वाढ झाली. शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील गारठा वाढला.  सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान 10 अंश सेल्सिअस. दोन दिवसांपासून पारा 10 अंशांवर स्थिर असून तापमानसुद्धा तीशीच्या खाली. पुढील आठवडाभर नाशिक जिल्ह्यात थंडीची कमाल तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता. रात्रीच्या तापमानात मोठी घट जवळपास रात्रीच्या तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमानाची घट झाली.

दिवसाच्या तापमानात सुद्धा घट होऊन 25 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचल. सकाळच्या वेळी रस्त्यावर धुके पडत असल्याचा अनुभव येत आहे. यावर्षी थंडी उशिराने दाखल झाली मात्र गेल्या दोन दिवसात थंडी वाढली आहे. काही भावात हलक्या पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. अमरावतीमध्ये सकाळपासून धुक्याची चादर बघायला मिळतंय. सकाळी साडेसात वाजता महामार्गावर हेडलाईट लावून वाहन चालवण्याची वेळ.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us