AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्यापूर्वी वातावरण तापलं, दौऱ्याला मोठा विरोध, महापौरांचा थेट इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्यापूर्वी आता वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक यांनी विरोध केला आहे.

किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्यापूर्वी वातावरण तापलं, दौऱ्याला मोठा विरोध, महापौरांचा थेट इशारा
kirit somaiyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 8:15 PM
Share

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या, आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले, त्यानंतर या प्रकरणात उडी घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं.  ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. त्यावरून देखील मोठा वाद झाला. या विधानावरून भाजपनं काँग्रेसला चांगलंच कोंडीत पकडलं. दरम्यान त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या हे मंगळवारी मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या या दौऱ्याला मालेगावमधील महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी जोरदार विरोध केला आहे.

मालेगावच्या माहापौर नसरीन शेख यांनी यावरून किरीट सोमय्या यांना थेट इशारा दिला आहे. हात मे दंडा, पैर में चप्पल पहनकर आम्ही किरीट सोमय्यांचा विरोध करणार, असं नसरीन शेख यांनी म्हटलं आहे.  मालेगावची बदनामी करणाऱ्यांना आम्ही मनपामध्ये येऊ देणार नाही,  SIT चा आजपर्यंत अहवाल आला नाही,  त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही.  मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम केलं जातं असंही यावेळी शेख यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या महापौर?

‘ किरीट सोमय्या हे मालेगावात येत आहेत, हात मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर आम्ही किरीट सोमय्यांचा विरोध करू,  हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी जन्म दाखला प्रकरणात मालेगावचे नाव बदनाम केले. सर्व नगरसेवक, उपमहापौर आणि महापौर आम्ही सर्व त्यांना विरोध करू. मी महापौर आहे आणि शहरातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे.  किरीट सोमय्या यांना आम्ही रोखणार.  महापौर, उपमहापौर, नगरसेवक एकत्रित येत त्यांना महापालिकेत येऊच देणार नाही, असं मालेगावच्या माहापौर नसरीन शेख यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  मालेगावचे नाव खराब केलं जात आहे,  आता प्रशासक राज नाही तर जनता राज आहे.  1044 लोकं या प्रकरणात अटकेत आहेत.  मालेगावला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. मालेगावची बदनामी करणाऱ्याला आम्ही महापालिकेत येऊ देणार नाही. मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम सुरू आहे, असा आरोपही यावेळी शेख यांनी केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...