जरांगे पाटलांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, मुंबईला जाण्यापूर्वीच डॉक्टरांनी दिला मोठा इशारा, तपासणीत नेमकं काय समोर आलं?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, मात्र तरी देखील जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान आता त्यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.

जरांगे पाटलांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, मुंबईला जाण्यापूर्वीच डॉक्टरांनी दिला मोठा इशारा, तपासणीत नेमकं काय समोर आलं?
manoj jarange
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 8:29 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 16 वा दिवस आहे. दरम्यान शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीमध्ये मुंबईतील आंदोलनाच्या तारखेची घोषणा केली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, आता पुन्हा एकदा आंदोलनाला परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे.

दरम्यान मुंबईला प्रस्थान करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.  मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन देखील घेतलेलं नाहीये, तर आजपासून त्यांनी पुन्हा एकदा पाणी देखील बंद केलं आहे. आपण आता पाणी सुद्धा पिणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.  दरम्यान जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील हे देखील उपोषणस्थळी दाखल झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत अशी विनंती त्यांना वैद्यकीय पथकाकडून करण्यात आली आहे.  जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देखील मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान उद्या पुन्हा एकदा दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. आंदोलनाला परवानगी नाकारली असून, मुंबईतील आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा असे आवाहान जरांगे पाटलांना मंत्र्यांनी केले आहे, या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us