AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळीचं रक्त सांडलं म्हणून; विद्यार्थिनींसोबत शाळेचं भयंकर कृत्य, शहापूर हादरलं

शहापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहर हादरलं आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मासिक पाळीचं रक्त सांडलं म्हणून; विद्यार्थिनींसोबत शाळेचं भयंकर कृत्य, शहापूर हादरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 6:33 PM
Share

शहापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहर हादरलं आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेतल्या मुलींची तपासणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शहापूरमधल्या आर. एस. दामानिया शाळेवर पालकांनी हा गंभीर आरोप केला आहे. स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे, संतप्त पालकांकडून आंदोलन देखील करण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेतल्या विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केल्याचा आरोप पालकांनी  शहापूरमधील आर. एस. दामानिया शाळेवर केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलींचे कपडे काढून शाळेतल्या शिक्षिकेंनी तपासणी केली, मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसारच हा प्रकार घडल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे. सर्व मुलींच्या फिंगर प्रिंटही शाळा प्रशासनानं घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पालकांचं आंदोलन 

पालकांकडून या शाळेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसारच हा प्रकार घडल्याचा पालकांचा आरोप आहे. मुख्यध्यापिकेवर कारवाई करा, शाळेवर कारवाई करा, शाळेला ताळं ठोका अशी मागणी संतप्त पालकांनी केला आहे. पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं आहे. पालकांनी केलेल्या आरोपांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मुलींमध्ये भीतीचं वातावरण 

दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी करण्यात आली, हा सर्व प्रकार मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसार झाला असा आरोप पालकांनी केला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे पालक चांगलेच संतप्त झाले असून, त्यांनी शाळेविरोधात आंदोलन केलं आहे, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.

Follow Us
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले