
सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी : कोकणातील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा कोकण मंडळाकडून तब्बल 5,000 हून अधिक घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, ही संधी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मध्यम वर्गीयांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. लॉटरी विविध योजनांतर्गत घेण्यात येणार आहे. अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
म्हाडा कोकण मंडळाने आजपासून जाहीर केलेल्या लॉटरीअंतर्गत एकूण 5,362 सदनिका आणि 77 भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. ही घरे व भूखंड पुढील पाच घटकांत विभागण्यात आले आहेत:
🔹 1. 20% सर्वसमावेशक योजना – 565 सदनिका
🔹 2. 15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – 3,002 सदनिका
🔹 3. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका) – 1,677 सदनिका
🔹 4. 50% परवडणाऱ्या सदनिकांची योजना – 41 सदनिका
🔹 5. भूखंड विक्री योजना – 77 भूखंड
📌 ऑनलाईन अर्ज सुरू – 14 जुलै 2025
📌 अर्ज करण्याची अंतिम मुदत – 13 ऑगस्ट 2025, रात्री 11.59
📌 अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत – 14 ऑगस्ट 2025, रात्री 11.59
📌 प्रारूप पात्र यादी जाहीर – 21 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6.00
📌 दावे व हरकती सादर करण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6.00
📌 अंतिम पात्र यादी जाहीर – 1 सप्टेंबर 2025, सायंकाळी 6.00
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट:
👉 https://housing.mhada.gov.in
सर्व अर्ज ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे संपूर्ण व अचूक असावीत. पात्रतेच्या आधारावर संगणकीकृत प्रणालीद्वारे लॉटरी काढली जाणार आहे. स्वतःचे हक्काचे घर मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. अर्जाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि आपल्या स्वप्नातील घराचे स्वामित्व मिळवा असे आवाहन देखील माढाकडून सर्वसामान्य नागरिकांना केले जात आहे.
दरम्यान, आता म्हाडाकडून हळूहळू सर्वच मंडळांची लॉटरी आणली जात आहे. त्यामुळे अनेकांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईतही लवकरच म्हाडा लॉटरी घेऊन येणार आहे. तत्पूर्वी कोकण मंडळाच्या लॉटरीसंदर्भात अतिरिक्त अटी आणि नियम म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी या अटी जरूर वाचाव्यात असेही सांगितले जात आहे.