Solapur | योगी आदित्यनाथांच्या प्रतिमेला सोलापुरात भाजपानं घातला दुग्धाभिषेक
सोलापूर भाजपातर्फे योगी आदित्यनाथांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, पेढे वाटून, ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला आहे. यूपीसह इतर चार राज्यात भाजपाने विजयी पताका फडकवल्याबद्दल सोलापुरात जल्लोष करण्यात आला आहे.
सोलापूर भाजपातर्फे योगी आदित्यनाथांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, पेढे वाटून, ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला आहे. यूपीसह इतर चार राज्यात भाजपाने विजयी पताका फडकवल्याबद्दल सोलापुरात जल्लोष करण्यात आला आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सत्तेवर येतायत. त्यामुळे भाजपामधील (BJP) त्यांचा मानमरातब आणि रुतबा आपसुकच वाढलाय. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) नंतर ते सर्वात शक्तीशाली नेते म्हणूनही ओळखले जातील. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी आज मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरणारा आहे. ही कामगिरी त्यांची दोन दृष्टीने या राज्यात ऐतिहासिक ठरणार आहे. पाच वर्षाचा कालखंड संपल्यानंतर 1985 नंतर पुन्हा दुसऱ्यांदा सत्तेवर येणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री आहेत.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

