यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहिला; अनुकरण करण्याच्या नादात सहावीतल्या मुलीचा मृत्यू

युट्यूबवर फाशी लावतानाचा व्हिडीओ पाहिला आणि त्याचे अनुकरण करण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलीने आपला जीव गमावला आहे. नागपूरच्या तहसील ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हंसापुरी भागात ही हृदयद्रावक घटना घडली.

यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहिला; अनुकरण करण्याच्या नादात सहावीतल्या मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 30, 2019 | 7:54 PM

नागपूर : युट्यूबवर फाशी लावतानाचा व्हिडीओ पाहिला आणि त्याचे अनुकरण करण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलीने आपला जीव गमावला आहे. नागपूरच्या तहसील ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हंसापुरी भागात ही हृदयद्रावक घटना घडली. तहसील पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी (29 जून) सायंकाळी ही घटना घडली. सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही  नेहमीप्रमाणे शाळा झाल्यानंतर दुपारी घरी आली. घरी ती तिच्या आईच्या मोबाईलवर खेळत बसली होती. यावेळी तिच्या 2 लहान बहिणीदेखील तिच्यासोबत होत्या. मोबाईलमध्ये युट्यूबवर व्हिडीओ पाहताना तिला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलींचा व्हिडीओ दिसला. या व्हिडीओ विषयी तिने आईला विचारणा केली. कामात व्यस्त असलेल्या आईने व्हिडीओत दाखवल्या प्रमाणे काही नसतं, असे सांगून मुलींकडे दुर्लक्ष केलं. मात्र, या मुलींच्या मनात त्या व्हिडीओ बद्दल कुतूहल निर्माण झालं.

त्यानंतर दोन्ही लहान बहिणींना घेऊन ही मुलगी आतल्या खोलीत गेली. खोलीचे छत अगदी 6 ते 7 फुटावर असल्याने तिने एका छोट्या स्टूलच्या साहाय्याने छतावरील पंखा लटकवण्याच्या हूकला दोरी बांधली. त्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याच्या पद्धतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अचानक खालचा स्टूल पडला आणि अल्पवयीन मुलीला गळफास लागला. हे दृश्य पाहून तिच्या दोन्ही बहिणी घाबरल्या आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या आईला आवाज दिला. मुलीला अशाप्रकारे गळफास लागलेला पाहून त्यांच्या आईला धक्का बसला. त्यांनी लगेच दोरी कापली. मात्र, तोपर्यंत ती बेशुद्ध झालेली होती. त्यानंतर तिला सरकारी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लहान मुलांकडून सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून झालेल्या दुर्घटना या काही नव्या नाहीत. मात्र, अशा दुर्घटना रोखण्यासाठी मुलं मोबाईलवर काय पाहात आहेत याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. शिवाय लहान मुलांना पडत असलेल्या प्रश्नांचे निराकरण करणे देखील तेवढेच गरजेचे आहे, असं या घटनेवरुन दिसून येतं.

संबंधीत बातम्या : 

दुचाकीला धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या

पब्जी गेम खेळू न दिल्याने छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केला

पायात बूट, कमरेला पट्टा, अंगात वर्दी, पोलीस स्टेशनमध्येच पोलिसाचा गळफास

अलिबागमध्ये हायप्रोफाईल रॅकेट, मुली पुरवणारे एजंट ताब्यात, 7 तरुणींची सुटका

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.