AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira road Attack : ISIS, लोन वुल्फ, जिहाद, गाझा… आरोपीच्या नोटमधील मजकुराने मीरारोड हादरले, हा तर दहशतवादी हल्ला?

मीरा रोड येथील चाकूहल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यापूर्वी आयसिस, जिहाद संबंधित चिथावणीखोर नोट लिहिल्या होत्या. तसेच तो आयसिसचे व्हिडिओ पाहत असल्याचेही उघड झाले. यामुळे या प्रकरणाचा तपास आता दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे.

Mira road Attack : ISIS, लोन वुल्फ, जिहाद, गाझा… आरोपीच्या नोटमधील मजकुराने मीरारोड हादरले, हा तर दहशतवादी हल्ला?
मीरा रोड हल्लाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 28, 2026 | 9:24 AM
Share

मुंबईतील मीरारोड येथे रविवारी सकाळी घडलेल्या भयानक घटनेने सगळेच हादरले. नयानगर (मीरा रोड पूर्व) येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे, अस्मिता एन्क्लेव्हजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सकाळी 8 च्या सुमारा एका इसमाने दोघांवर चाकू हल्ला केला. जैब जुबेर अन्सारी असे आरोपीचे नाव असून यामध्ये दोघे जखमी झाले. पोलिसांनी जैब जुबेर अन्सारी याला अटक केली असून आता याचप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मीरा रोड चाकू हल्ल्यात गंभीर गोष्टी आढळल्याने आता या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. तुला कलमा वाचता येतो का ? नमाज पढता येतो का असं विचारून आरोपीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला होता. एवढंच नव्हे तर आरोपीने ISIS, जिहाद अशी लिहीलेली नोटसुद्धा आढळली आहे.आरोपी जैब हा ISIS शी संबंधित व्हिडीो पहात होता, असंही तपासातून समोर आलं आहे. तसेच आरोपीने सुरक्षा रक्षकावर चाकूने हल्ला केला, तेव्हाचा आणखी एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. याप्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे.

आरोपीचा चाकूहल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला ?

मिरारोडच्या नयानगरमध्ये आरोपीने केलेला चाकुहल्ला हा एकट्याने केलेला दहशतवादी हल्लाच असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाच्या तपासात गंभीर गोष्टी आढळल्याने आता केसचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.आरोपी जैब जुबेर अन्सारी याने रविवारी दोन सुरक्षारक्षकांवर चाकू हल्ला केला, मात्र त्यापूर्वी त्याने दहशतवादास पुरस्कृत करणारी नोट लिहीली होती असं समोर आलं आहे. या नोटवर आरोपीने ISIS, lone wolf, jihad, GAZA असे शब्द लिहिल्याचं आढळून आलं.

एवढंच नव्हे तर आरोपीने आणखी एका पानावर (your mushrikeens will se real jihad in india terrotery) ‘आता हिंद भूमीत खरा जिहाद दिसेल’ असा आक्षेपार्ह मजकूर लिहीला होता, असंही आढळलंय. त्याचबरोबर आणखी एका कागदावर आता लोन वुल्फ तुमच्यावर झडप घालतील असंही मजकूर आरोपीने लिहून ठेवल्याचं समोर आलं आहे.

आरोपी पहायाचा ISISशी संबंधित व्हिडीओ

याप्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. चाकूहल्ला करणारा आरोपी जैब हा, मागील काही दिवसापासून आयसीसशी (ISIS) सबंधित अनेक व्हिडिओ बघत होता अशीही माहिती उघड झाली आहे. आरोपी हा 2019 सालापर्यंत युएसमध्ये वास्तव्यास होता, त्यानंतर तो भारतात परतला. सध्या महाराष्ट्र एटीएसकडून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान आरोपीने सुरक्षारक्षकावर चाकूने हल्ला केला, त्याचा आणखी एक फोटो समोर आलाय. आरोपी जैब जुबेर अन्सारी चाकू हातात घेऊन सुरक्षारक्षकासमोर उभा असलेला फोटो आला समोर आला. तुला कलमा वाचता येतो का ? नमाज पढता येतो का असे विचारून आरोपीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला होता.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच