“भगतसिंग कोश्यारी भाजपवाल्यांचा जावई लागतो का?”; ‘धर्मवीर’ आणि ‘स्वराज्यरक्षक’ यामधील तुम्ही आम्हाला फरक शिकवू नका; ‘या’ नेत्याचं भाजपला खुलं आव्हान

राज्यात आणि केंद्रात तुघलकी सरकार असून हे औरंगजेब विचारांचे सरकार असल्याची सडकून टीका अमोल मिटकरी यांनी यावेळी केली.

भगतसिंग कोश्यारी भाजपवाल्यांचा जावई लागतो का?; धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक यामधील तुम्ही आम्हाला फरक शिकवू नका; या नेत्याचं भाजपला खुलं आव्हान
| Edited By: | Updated on: Jan 03, 2023 | 9:50 PM

अकोलाः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र अजित पवार यांच्या समर्थनाथ आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना इतिहासाचा दाखला देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा येत होत्या आणि त्या भाषा त्यांनी जाहीर सांगावे असं खुलं आव्हानही आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी केले.

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केले होते. त्यावेळी यांचा सन्मान कुठे गेला होता. कोश्यारी भाजपवाल्यांचा जावई आहे का त्यावेळी का त्यांना आंदोलन केले नाही असा सवालही अमोल मिटकरी यांनी केला आहे.

भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील यांनी ज्या वेळ बेताल वक्तव्य केली होती. त्यावेळी हे गप्प का बसले होते.

त्यामुळे राज्यात आणि केंद्रात तुघलकी सरकार असून हे औरंगजेब विचारांचे सरकार असल्याची सडकून टीका अमोल मिटकरी यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ मोठ्या वल्गना करू नये. त्यांनी आधी छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा अवगत होत्या.

त्यांची त्यांनी यादी सांगावी व त्या भाषा कोणकोणत्या होत्या हेही त्यांनी सांगावे असं खुलं आव्हानही आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.