AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर केला हल्लाबोल बोल, …म्हणाले नाहीतर सरकार झुकलं असतं

आमदार एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर केला हल्लाबोल बोल, ...म्हणाले नाहीतर सरकार झुकलं असतं
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 31, 2022 | 3:35 PM
Share

जळगाव : माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशनात माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही असाही आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला असं स्पष्ट बोलत खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात अधिवेशन असताना विदर्भाच्या प्रश्नाला न्याय नाही असा थेट आरोप करत एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादकांच्या अडचणीवर भाष्य केलं आहे. कापूस उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. 14 हजाराहून 6000 कापसाचा भाव गेला आहे त्यावर कुणीही बोलत नाही म्हणत खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला बोल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कापसाला योग्य भाव नाही, दोन ते तीन हजार अनुदान या सरकारने मदत म्हणून दिली असती तर न्याय मिळाला असता असं खडसे यांनी म्हंटले आहे.

दोन्ही पक्षाच्या एकानेही कापसाचा हा प्रश्न लावून धरला असता तर सरकार झुकलं असतं, अधिवेशनात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही.

महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या कोणत्याच प्रश्नाला या ठिकाणी विचारले गेले नाही, गंभीर प्रश्न बाबत सरकार हे असंवेदनशील आहे असा आरोप खडसे यांनी केला आहे.

सातत्याने फक्त एकच प्रश्न समृद्धी महामार्ग, मात्र ग्रामीण भागातल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे याकडे दुर्लक्ष आहे.

अधिवेशनात भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले मात्र आरोप झाल्यावरही एकही जण पद सोडायला तयार नाही, उलट भ्रष्टाचाराच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करत आहे.

अधिवेशनात प्रश्न हे सर्व अनुत्तरीत राहिले, मला याविषयी खंत आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर दिली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?