जरांगेंना परवानगी नाकारताच आव्हाड संतापले; एका प्रश्नाने सरकार अडचणीत; काय म्हणाले?

जरांगे यांना मुंबईत येण्यास मनाई करण्यात आल्यानंतर आता जास्तच वातावरण तापले आहे. जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, आता न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी मराठ्यांना हे सरकार बदमान करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

जरांगेंना परवानगी नाकारताच आव्हाड संतापले; एका प्रश्नाने सरकार अडचणीत; काय म्हणाले?
jitendra awhad and manoj jarange patil
| Updated on: Aug 26, 2025 | 8:59 PM

Jitendra Awhad On Manoj Jarange Patil Protest : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी येत्या 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर धडकणारच अशी भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केल्यानंतर मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचे दार ठोठवणार असल्याचे सांगितले. जरांगे यांना मुंबईत येण्यास मनाई करण्यात आल्यानंतर आता जास्तच वातावरण तापले आहे. जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, आता न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी मराठ्यांना हे सरकार बदमान करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

हे सरकार एकाच समाजासाठी आहे का?

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. न मागता राज्य सरकारने परुशराम मंहामंडळ स्थापन केले. हेच सरकार मात्र मराठ्यांना मुंबईत येऊसुद्धा देत नाहीये, असा हल्लाबोल करत आव्हाड आंनी हे सरकार एकाच समाजासाठी आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. तसेच हे राज्य सरकार मराठ्यांना बदनाम का करत आहे? इतका जातीद्वेस कशासाठी दाखवला जातोय, असेही काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही

मराठा समाजाने आतापर्यंत काढलेले सगळे मोर्चे हे आदर्श असे होते. जगभरात त्या मोर्चांची चर्चा झाली. आताही ते त्यांच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतील तर त्यांचा तो हक्क आहे. सरकार हे मायबाप असतं. त्यांनी त्या भूमिकेतून मराठा समाजाच्या मागण्यांकडे पाहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच लक्षात घ्या राज्यातील एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही. तसेच एका समाजासोबत पक्षपातीपणाने वागू शकत नाही, असेही आव्हाड यांनी सुनावले आहे.

जरांगेंनी काय भूमिका जाहीर केली?

दरम्यान, आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमची कायदेशीर टीम न्यायालयात जाईल. आम्ही मुंबईत येणार आहोत. आम्ही तेथे आल्यावर शांततेच आंदोलन करू. आम्हच्यासाठी न्यायालया आदरस्थानी आहे, अशी भूमिका जरांगे यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.