AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरत गोगावले यांनी तिथे जायला नको होते… गोगावले तटकरेंच्या भेटीने नाराजी, महेंद्र दळवी यांनी थेट..

आमदार महेंद्र दळवी यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी भरत गोगावले गणपतीसाठी गेल्याने नाराजी जाहीर केली. फक्त नाराजीच नाही तर सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

भरत गोगावले यांनी तिथे जायला नको होते... गोगावले तटकरेंच्या भेटीने नाराजी, महेंद्र दळवी यांनी थेट..
Bharat Gogawale and Sunil Tatkare
| Updated on: Sep 18, 2026 | 7:19 PM
Share

आमदार महेंद्र दळवी यांनी भरत गोगावले सुनील तटकरेंच्या घरी गणपती दर्शनाला गेल्याने नाराजी जाहीर केली. महेंद्र दळवी यांनी म्हटले की, रायगड जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भरत गोगावले यांनी जायला नको होते. सुनील तटकरे हे भरत गोगावले यांच्या घरी गणपती बघायला जातील का असं देखील सवाल महेंद्र दळवी यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून नाही तर सुनील तटकरे यांच्या वरती आमची नाराजी हे निश्चित आहे. अनेकांना सुनील तटकरे यांनी रस्त्यावर आणून सोडण्याचं काम निश्चित केले आहे. तटकरे कुटुंबाविषयी आमची नाराजी नक्की आहे. नितीन गडकरी यांच्या विधानावर बोलताना दळवी यांनी म्हटले की, केंद्रीय मंत्री अशा पद्धतीचा वक्तव्य करत असतील तर या सर्व पद्धतीचा दोष तटकरेंवर निश्चित जातो.

आतापर्यंत वीस वर्षात जेवढे कॉन्टॅक्टर निघून गेले त्याच्या बापाचा बाप तटकरेच आहे निश्चित त्याच्यावरती आम्ही आरोप करतो. तटकरेंनी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये गेल्या 20 वर्षात प्रोजेक्ट आणले ते अर्धवट आहेत तटकरेने एकाच कामात दहा दहा वेळा निधी टाकून सरकारी लूट करणे हा त्यांच्या कुटुंबीयांचा व्यवसाय आहे. अशा उद्भवलेला परिस्थितीमध्ये भरत गोगावले यांनी तटकरे यांच्या घरी गणपतीला दर्शनाला जाणे उचित नाही.

भरत गोगावले यांनी असं वक्तव्य करणं उचित नाहीये. कदाचित अनिकेत तटकरे आमच्यामुळे आमदार झाले तटकरे यांच्या कुटुंबामुळे भरत गोगावले पालकमंत्री झालेले नाहीत, पालकमंत्री होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून त्यांना हे पद मिळाले आहे. तटकरे यांनी पालकमंत्री पद थांबवले होते…राजकीय गेम प्लॅन करणे तटकरेचं काम आहे.

ब्लॅकमेलिंग राजकारणामध्ये करण हे तटकरे फॅमिलीचा व्यवसाय निश्चित आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही विधान परिषदेची सीट सोडले आणि राष्ट्रवादीला दिले. कोकणाची हक्काची सीट आम्ही दिली हे आम्हा कोकण वासियांचं दुर्दैव निश्चित आहे. यामध्ये देखील उदय सामंत यांची भूमिका महत्त्वाची होती त्यांचे देखील तटकरे विषयी प्रेम ऊतू आलं होतं. आज आम्ही त्या मतावर सहमत आहोत की अनिकेत तटकरे आमच्यामुळे विधान परिषदेचे आमदार झाले भरत गोगावले त्यांच्यामुळे पालकमंत्री झाले हा शोध मोहिमेचा विषय निश्चित आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?