AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अखेर अर्चना पाटील यांच्याकडून मोठा खुलासा

bjp politics : अर्जना पाटील यांच्या टीकेमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता अर्चना पाटील यांनी पोस्ट करून वादावर पडदा टाकला आहे.

मोठी घडामोड! भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अखेर अर्चना पाटील यांच्याकडून मोठा खुलासा
| Updated on: Aug 06, 2026 | 8:12 AM
Share

धाराशिव जिल्ह्यात भाजपमध्येच अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी टीका केली. त्यानंतर राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमातून भाजप आमदार राणा पाटील या वेगळल्याने भाजपमधील जुने विरुद्ध नवे नेते असा असंघर्ष सुरु झाला होता. त्यावर टीका केल्यानंतर आता भाजपच्या महिला नेत्या अर्चना पाटील यांनी पोस्ट करत वादावर पडदा टाकला आहे.

” त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा भाजप परिवार, असं म्हणत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचा सोशल मीडियावर मोठा खुलासा केला आहे. भाजपतील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांमधील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी फेसबुकवर खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

भाजपच्या संघटन बांधणीत गेल्या ३० वर्षांत जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान काय?” असा सवाल करणाऱ्या अर्चना पाटील यांच्या पोस्टमुळे जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या संबंधित मजकूर माझ्या सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगीशिवाय अनवधानाने अधिकृत स्टेटसवर पोस्ट केल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या मी मुलाच्या पदवीदान सोहळ्यासाठी परदेशात असून वेळेतील फरकामुळे ही चूक घडल्याची अर्चना पाटील यांनी माहिती दिली. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

अर्चना पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी

अर्चना पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते’.

‘भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील, असेही त्या म्हणाल्या.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट