AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘… तर सरकारला महागात पडेल’, अजित दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा

Rohit Pawar : राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघातावर वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. आता त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

'... तर सरकारला महागात पडेल', अजित दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा
Rohit pawar Ajit PawarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 8:06 PM
Share

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. अजित दादांच्या विमान अपघातानंतर मिळालेला ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता यावरून रोहित पवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आहे…

ब्लॅक बॉक्सच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे? किती जळालेला आहे याचीही माहिती आमच्याकडे आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय याची कसा तपास करते याची आम्ही वाट पाहत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने मी सरकारमधील लोकांना सांगू इच्छितो की, आम्ही आतापर्यंत फक्त 20 ते 30 टक्के माहिती दिली आहे. आमच्याकडे आणखी 70 टक्के माहिती आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि जर त्यात काही काळंबेरं झालं तर सरकारला महागात पडेल.’

विमान अपघाताचा अहवाल कधी येणार?

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविल एव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात माहिती दिली आहे.’ त्यामुळे आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘तपासात थातूर मातून माहितीपेक्षा काही प्रमाणात सविस्तर माहिती दिली गेली तर तपास योग्य दिशेने जात आहे असं आम्ही समजू. मात्र उगाचचं काहीतरी द्यायचं म्हणून दिलं तर मग मराठी माणूस काय आहे ते दाखवावं लागेल.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...