AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी कोण होता?..पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ,गायकवाड यांची दिलगिरी म्हणाले, ‘बापाचे नाव देखील एकेरी…

'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी महाराजांचे नाव सन्मानाने घ्यावे असे आवाहनही केले आहे.

शिवाजी कोण होता?..पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ,गायकवाड यांची दिलगिरी म्हणाले, 'बापाचे नाव देखील एकेरी...
Mla Sanjay Gaikwad
| Updated on: Apr 24, 2026 | 5:09 PM
Share

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करणारे शिवसेनेचे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.मी जे काही त्यांना शिवीगाळ केली त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा पत्नीबद्दल जे काही बोललो असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र महाराजांचे नाव सन्मानजनक घ्यावे, त्यांचे नाव एकेरी करुन करोडो हिंदूंच्या दैवतांचा अपमान करु नये असेही आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरुन पुन्हा महाराष्ट्रात वाद सुरु झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या शिवीगाळ प्रकरणावरुन पुरोगामी वर्तुळात संताप व्यक्त होत होता. समाजमाध्यमात यावरुन संजय गायकवाड यांच्या शिवराळ भाषेवरुन टीकेची झोड उठली होती. या व्हिडीओ वरुन वादंग उठल्यानंतर आज आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतू महाराजांचे नाव सन्माजनकपणे छत्रपती शिवाजी महाराज असे घ्यावे. आपण आपल्या बापाचे नाव देखील एकेरी घेत नाही. त्यामुळे या पुस्तकाचे वाचन करताना महाराजाचे नाव संपूर्ण घ्यावी, मग हवे तेवढे वाचन करावे आम्ही देखील ऐकायला येऊ. परंतू महाराजांचे नाव एकेरी घेऊन करोडो हिंदूंच्या दैवताचा अपमान करु नये असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

हे पुस्तक पुन्हा चर्चेत

शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. या पुस्तकावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ केल्याने हे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दोन दिवसांपूर्वी बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यांना पानसरे यांच्या जागी पाठवण्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुन पुरोगामी वर्तुळात खळबळ उडाली होती.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन