AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आष्टीवरुन पंकजा मुडें अन् सुरेश धस यांच्यात वादंग, ‘इकडे नाही तर तुमच्या मतदारसंघावर…’, धस यांचा टोला

पंकजा ताईंनी यांनी मुळ मतदार संघावर जास्त लक्ष द्यावे. तिकडे सर्व हायजॅक झाला आहे. निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळे केज हा एकाच मतदार संघ असल्याचे म्हटले होते. मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदार संघ झाला?

आष्टीवरुन पंकजा मुडें अन् सुरेश धस यांच्यात वादंग, 'इकडे नाही तर तुमच्या मतदारसंघावर...', धस यांचा टोला
सुरेश धस, पंकजा मुंडे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 10, 2025 | 6:54 PM
Share

भारतीय जनता पक्षातील दोन नेत्यांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहे. भाजप नेत्या आणि पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदार संघात सोमवारी सभा घेतली. या सभेत आपले आष्टीवर विशेष लक्ष असणार असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर आष्टीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी पलटवार केला आहे. तुम्ही तुमचा मतदार संघ सांभाळा, आष्टीकडे लक्ष देण्यास आपण समर्थ आहोत, तसेच निवडणुकीत काय म्हणाल्या होत्या? त्याची आठवणही सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना करुन दिली.

काय म्हणाले सुरेश धस

आष्टीवर आपले विशेष लक्ष असणार आहे, या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार सुरेश धस म्हणाले, आष्टीवर त्यांनी गेल्या निवडणुकीत खूप प्रेम केले होते. आजच्या कार्यक्रमातही त्यांचे ज्याच्यावर प्रेम असतील ते लोकच त्या ठिकाणी आले असतील. या कार्यक्रमात शिट्टीवाले, घड्याळ्यावाले हजर असतील. एकवेळा तुम्ही कॅमेरा उपस्थित लोकांवर फिरवा. आष्टीतील भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि भाजपच्या लोकांवर प्रेम करण्यास मी समर्थ आहे. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करु नये, अशी माझी विनंती आहे.

सुरेश धस पुढे म्हणाले, पंकजा ताईंनी यांनी मुळ मतदार संघावर जास्त लक्ष द्यावे. तिकडे सर्व हायजॅक झाला आहे. निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळे केज हा एकाच मतदार संघ असल्याचे म्हटले होते. मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदार संघ झाला? पंकजा मुंडे यांनी जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या केजमधील राखेवर द्यावे, वाळूवर द्यावे, त्यांच्या मतदार संघात गायरान जमीनी हडप केल्या गेल्या आहेत, तिकडे द्यावे. आमच्या मतदार संघावर लक्ष देऊ नये, असे सुरेश धस यांनी त्यांना सुनावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर आमदार सुरेश धस यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज ठाकरे यांचे बोलण लोकांना अपील होत असते. त्यामुळे त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली होती, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री गेले असतील.

Follow Us
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज