AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवार गटाचे आमदार नाराज? पवारांचा विश्वासू शिलेदार आमदारांसह थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला, घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत, त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! शरद पवार गटाचे आमदार नाराज? पवारांचा विश्वासू शिलेदार आमदारांसह थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला, घडामोडींना वेग
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 6:24 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सोलापूरमध्ये आहेत.  विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र त्यापूर्वीच घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार दाखल झाले आहेत.  यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहेत, उत्तम जानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. उत्तम जाणकर हे आमदार अभिजीत पाटील  आणि नारायण पाटील यांच्यासह रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित आहेत.  मात्र बैठकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होत आहे.

मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.  तसेच विधानपरिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील जाहीर केले होते.  मात्र आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापुरात होत असातना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीये.

नाराजीचा फटका बसणार?

दरम्यान सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आल्याने या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा