AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारे ढेकूण, शिवसेनेचं रक्त पित्ये .. संतप्त कृष्णा अष्टीकर यांचा जोरदार हल्ला

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतमोजणी सुरू असून, थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. नांदेडमध्ये कृष्णा पाटील आष्टीकर विजयासाठी आशावादी आहेत. त्यांचे वडील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेला कृष्णा आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, त्यांची "ढेकूण" अशी उपमा देऊन राजकीय कलगीतुरा अधिकच तीव्र केला आहे.

सुषमा अंधारे ढेकूण, शिवसेनेचं रक्त पित्ये .. संतप्त कृष्णा अष्टीकर यांचा जोरदार हल्ला
Ashitikar vs Andhare
| Updated on: Jun 22, 2026 | 9:04 AM
Share

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर 11 जागांवर आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. नांदेडमध्येही , सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे हिंगोली-परभणीचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत.  आज लागणाऱ्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी टीव्ही9 मराठीशी खास बातचीत करत विजयाबद्दल आशा व्यक्त केली. निकालाबाबत मला प्रचंड आशावाद आहे, मी ज्याप्रमाणे गणित लावली होती, त्या पद्धतीने मतदान तर झालंय, शेवटी आई जगदंबेची इच्छा , असं ते म्हणाले. माझे पूर्ण प्रयत्न करू झाले. मतदानही झालंय आणि आता मतदारराजाने कोणाल कौल दिलाय हे लौकरच दिसेल, पाहूया असं आष्टीकर म्हणाले.

मात्र या घडामोडी आणि निवडणूक निकालाच्या दरम्यान राजकीय कलगीतुराही रंगलेला पहायला मिळाला. एकीकडे शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये कृष्आम आष्टीकर यांचे वडील नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. मात्र आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत असा दावा कृष्णा पाटील आष्टीकर यांनी केलाय. असं असलं तरीही शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या फुटीनंतर कृष्णा आष्टीकरांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंसोबतची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वत:चाच वडिलांचे पिंडदान करावे. वडिलांच्या प्रतिमेला जोडे मारावे अशी मागणी अंधारे यांनी केल्यावर अष्टीकर यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

ती विकृत बाई..

आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी पुन्हा सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. काही लोकांनी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या, काही मागण्या केल्या होत्या, त्याही गोष्टींना मी सडेतोड उत्तर देणार आहे, असं त्यांनी सुनावलं. माझी भूमिका बरेच वेळा स्पष्ट केली आहे. पण एक कुठलीतरी अतिशय वाचाळ, तोंडाळ बाई, कालसुद्धा बोलली. राजुल पाटील, माझी भगिनी काल मातोश्रीवर गेली, उद्धव ठाकरेंना भेटून आली, तरीसुद्धा या विकृत बाईने, काल आमच्या दोघांवर शंका उपस्थित केली, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. आता बस करावं असं वाटायला लागलं आहे, असंही ते पुढे म्हणाले.

ती शिवसेनेचं ढेकूण, रक्त पित्ये पक्षाचं

पुढे आष्टीकरांनी अंधारेंवर आणखी जोरदार टीका केली. त्या बाईला टीआरपी घ्यायची सवय लागली आहे, ती विकृत मानसिकतेची बाई आहे. माझे वडील जिवंत असताना तिने माल पिंडदान कर किंवा असं काही सांगितंल, मला त्या महिलेबद्दल फारसं काही बोलावसं वाटत नाहीये. मी आधी तिला चुकीची उपमा दिलेली सरडा म्हणून. खरंतर ती आता शिवसेनेचं ढेकूण झाली आहे ढेकूण.. म्हणजे ती आता असं रक्त पित्ये ना पक्षाचं , की ती आतून सर्वांना पोकळ करत्ये अशा शब्दांत कृष्णा आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण