तुम्ही मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड, आयुक्तांच्या विधानानंतर मनसैनिक आक्रमक, पुणे पालिकेत राडा

पुणे पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या एका विधानामुळे मनसैनिक मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलनासाठी बसले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुम्ही मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड, आयुक्तांच्या विधानानंतर मनसैनिक आक्रमक, पुणे पालिकेत राडा
Pune Palika
| Updated on: Aug 06, 2025 | 7:24 PM

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पालिकेत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या एका विधानामुळे मनसैनिक मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलनासाठी बसले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मनसे नेते-कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात घुसले

समोर आलेल्या माहितीनुसार, महापालिकेत एक बैठक सुरू होती. या बैठकीदरम्यान मनसेचे काही नेते आणि कार्यकर्ते थेट आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालनात गेले. यामुळे नवल किशोर राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे नेत्यांना सुनावले. मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात असं नवल किशोर राम यांनी म्हटलं. त्यामुळे वाद झाला आणि वातावरण बिघडले.

आयुक्त नवल किशोर राम यांच्या या विधानानुळे पुणे महानगरपालिकमध्ये आयुक्तांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांकडून गेट तोडण्याचा प्रयत्न झाला. यामुळे महानगरपालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

साईनाथ बाबर काय म्हणाले?

याबाबत बोलताना पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की, आम्ही जनतेच्या पश्नासाठी गेलो होतो. आयुक्तांनी याबाबत माफी मागितली पाहिजे. आम्ही गुंड नाहीत. आम्ही महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे लोकप्रतिनिधी आहोत. ते गुंड आहोत असं म्हणतात. मराठी माणूस गुंड आहेत का? अस असेल तर तुम्ही महाराष्ट्रात काम करायला यायचचं नव्हतं. आज आयुक्त जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही आयुक्तांना जाऊ देणार नाही.

आयुक्तांची प्रतिक्रिया

या सर्व प्रकरणावर बोलताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, माझी मीटिंग सुरु होती, अचानकपणे तीन चार लोक आले. ते कसे आले मला माहिती नाही. कुठलेही कारण नसताना आत घुसून मला बोलायला लागले. माझं काम सुरू असताना वाद घातला. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी कुठलीही धमकी दिली नाही. माझी बैठक सुरू असताना आले यामध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे मी यावर चर्चा करेन असं नवल किशोर राम यांनी म्हटलं आहे.