टँकर माफियांना पाणी मिळतं, मग घरच्या नळाला का नाही? अविनाश जाधवांचा मीरा भाईंदर पालिका आयुक्तांना सवाल

टँकर माफियांना पाणी मिळतं, मग घरच्या नळाला का नाही?, असा सवाल मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

टँकर माफियांना पाणी मिळतं, मग घरच्या नळाला का नाही? अविनाश जाधवांचा मीरा भाईंदर पालिका आयुक्तांना सवाल
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 4:53 PM

मीरा भाईंदर :  टँकर माफियांना पाणी मिळतं, मग घरच्या नळाला का नाही?, असा सवाल मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदर पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना केला. नागरिकांचा पाण्याचा गंभीर प्रश्न गंभीर आहे. आपण यामध्ये तात्काळ लक्ष घाला, अशी विनंती अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त राठोड यांना केली. (MNS Avinash Jadhav Meet Mira bhayandar commissioner Dr vijay Rathod)

मीरा भाईंदर शहरातील रखडलेल्या अनेक समस्यांबाबत आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. अनधिकृत बांधकामे, पाणी प्रश्न, कोव्हिड उपाययोजना, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया, रस्त्यावरील खड्डे अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

लोकहिताच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर माझी आयुक्तांशी चर्चा झाली. त्यांनी देखील मी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

मीरा भाईंदर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमरा बसवण्याची मागणी केली आहे. पहिल्या टप्यातील 25 सीसीटीव्ही कॅमरा मनसेच्या वतीने देण्यात येणार असल्याचंही अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले.

अविनाश जाधवांची धडक आंदोलने, कडक रिझल्ट

मी गेली अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय. कोणतंही आंदोलन मी स्वत:साठी केलेलं नाही, अशा भावना व्यक्त करत कोव्हिड काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं होताना दिसली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबईत ‘थायरोकेयर लॅब’विरोधात आंदोलन केलं होतं. या लॅबमधून कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर मनसेने ही लॅब बंद पाडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं.

(MNS Avinash Jadhav Meet Mira bhayandar commissioner Dr vijay Rathod)

संबंधित बातम्या

शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, अविनाश जाधवांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिक मनसेत

‘क्या हुआ तेरा वादा?’ उद्धव ठाकरेंच्या साडेतीन वर्ष जुन्या व्हिडीओवरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा सवाल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.